महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० नोव्हेबर । राज्यात 1 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाकडून शाळांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता पहिली ते चौथी व शहरी भागातील इयत्ता पहिली ते सातवी वर्ग सुरक्षितपणे सुरू करण्यासाठी या मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत.
विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या वर्गात 15 ते 20 विद्यार्थी एका वर्गात बसतील. एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल, विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांत शाळा भरावी. एका वर्गात दोन बाकांमध्ये सहा फुटांचे अंतर असणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलवावे, एक बॅच पहिल्या दिवशी तर दुसरी बॅच दुसऱया दिवशी पिंवा सकाळ दुपार सत्रामध्ये विभागणी करावी. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांची संमती आवश्यक असेल.
ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या तर महानगरपालिका क्षेत्रातील शाळांसाठी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली अगोदर समिती गठीत आहे. या समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी काही बाबींवर चर्चा करावी, असे सांगण्यात आले आहे. यामध्ये शाळा सुरू करण्यापूर्वी संबंधित शहरात पिंवा गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱयांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक, शाळेत गर्दी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना परिसरात प्रवेश देऊ नये.