या राशीला आज अचानक धनलाभाचे योग ; पहा आजचे राशीभविष्य

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ डिसेंबर ।

मेष:-
आज संमिश्र फळे मिळतील. मनातील बदलांकडे लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. हेतु मनात धरून कामे कराल. महिलांनी शांत राहावे.

वृषभ:-
आज आपल्याला समोरील आलेली संधी सोडू नका. स्वत:चा फायदा लक्षात घेऊन वागाल. नवीन विचारांनी त्रस्त राहाल. ठोस निर्णयाची गरज आहे. भावंडांमध्ये प्रेमभाव राहील.

मिथुन:-
आज दिवसाची सुरुवात प्रफुल्लित होईल. स्थिर चित्ताने कामे सुरू करावीत. सुंदर वस्त्रे परिधान कराल. मनातील नकारात्मक विचार दूर सारा. आवडती व्यक्ति भेटेल.

कर्क:-
आज मानसिक अस्वस्थता जाणवेल. अंतिम निर्णयाला पोहोचायला वेळ लागेल. संबंधितांचे गैरसमज होऊ शकतात. वादापासून दूर राहा. आरोग्याची काळजी घ्यावी.

सिंह:-
आज दिवस चांगला जाईल. मनाची द्विधावस्था टाळावी. नवीन कार्य हाती घेताना संपूर्ण विचार करावा. सहलीचा बेत आखाल. धनलाभ संभवतो.व्यवहार करताना सतर्क रहा .

कन्या:-
आज दिवस शुभ आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांकडून फायदा होईल. कुटुंबात सामंजस्याचे वातावरण राहील. कामासाठी बाहेर गावी जावे लागू शकते. सरकारी कामात अधिक वेळ जाईल.

तूळ:-
आज बौद्धिक कामात व्यग्र राहाल. निवास चांगला जाईल . कौटुंबिक जबाबदारीत वाढ होईल. दूरचा प्रवास संभवतो. धार्मिक स्थळाला भेट द्याल. मुलांविषयी चिंता लागून राहील.

वृश्चिक:-
आज दिवस सावधानतेने घालवावा. रागावर नियंत्रण ठेवावे. अनैतिक कृत्ये करू नयेत. नामस्मरणाने लाभ होईल. राजकीय खेळ खेळू नका. व्यवहार करताना काळजी घ्या .

धनू:-
आज दिवस समाधानात जाईल. स्वत:चे निर्णय स्वत: घ्या. राजकीय गोष्टींपासून दूर राहावे. प्रवासाचा बेत आखाल. आपली आवड जोपासाल. आरोग्य उत्तम असेल .

मकर:-
आज व्यापारी वर्गाला दिवस चांगला आहे . व्यापारात वाढ होईल. मनाजोगी कमाई करता येईल. आज वैचारिक बदल दिसून येईल. सहकारी मदत करतील. आवश्यक ठिकाणीच खर्च कराल.

कुंभ:-
आज नवीन कामाची सुरुवात करू शकता. मत परिवर्तन होण्याची शक्यता आहे. महिलांनी सबुरीने वागावे. मुलांविषयी चिंता लागून राहील. पोटाच्या तक्रारी राहतील.

मीन:-
आज नावडत्या घटनांनी निराश होऊ नका. कौटुंबिक स्वास्थ्य जपावे. मनाची मरगळ दूर सारावी. वाहन जपून चालवावे. कागदपत्रे जपून ठेवावीत. आरोग्यबाबत काळजी घ्यावी .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *