नव्या युगातील डिजिटल प्लॅटफॉर्म; आयडीएफसी फर्स्ट बँंकेने सादर केले मेटल डेबिट कार्ड

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ डिसेंबर । आयडीएफसी फर्स्ट बँकेतर्फे आज फर्स्ट प्रायव्हेट इनफायनाइट हे देशातील पहिलेवहिले स्वतंत्र मेटल डेबिट कार्ड, व्हिसा या डिजिटल पेमेंटमधील जागतिक पातळीवर आघाडीवर असलेल्या कंपनीच्या भागीदारीने सादर करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली.

फर्स्ट प्रायव्हेट इनफायनाइट हे लाइफटाइम फ्री कार्ड असून ते बँकेच्या फर्स्ट प्रायव्हेट प्रोग्रॅम या प्रीमिअम सेव्हिंग्ज आणि वेल्थ ऑफरिंगचा भाग असलेल्या कस्टमर्ससाठी खास डिझाइन करण्यात आले आहे. फर्स्ट प्रायव्हेट प्रोग्रॅम ग्राहकांना अतुलनीय बँकिंग व गुंतवणूक अनुभव प्रदान करतो आणि असामान्य गुंतवणूक, बँकिंग, लाइफस्टाइल व वेलनेस लाभ देतो.

फर्स्ट प्रायव्हेट इनफायनाइट हे गडद काळ्या रंगाचे कार्ड हायब्रीड धातूपासून तयार करण्यात आले आहे आणि चांदीमध्ये तपशील कोरण्यात आले आहेत. आपल्या सर्वोत्तम प्रस्ताव पूर्ण करत प्रीमिअम कार्डधारकांसाठी फर्स्ट प्रायव्हेट इनफायनाइट डेबिट कार्डाचे लाभ तयार करण्यात आले आहेत. यात कार्डहोल्डर्ससाठी व त्यांच्या कम्पॅनिअन्ससाठी कॉम्पिमेंटरी डोमेस्टिक व इंटरनॅशनल लाउंज अॅक्सेस, अतुलनीय विमा संरक्षण, रस्ते सहाय्य कार्यक्रम आणि देशातील गोल्फ कोर्सेसचा अॅक्सेस इत्यादी लाभ समाविष्ट आहेत.

आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या रिटेल लायेबिलिटीज विभागाचे प्रमुख अमित कुमार म्हणाले, “मेटल कार्ड्सचा लुक आणि फील पाहता त्यांना ग्राहकांकडून प्राधान्य देण्यात येत आहे. आमचे पहिले प्रायव्हेट इनफायानाइट डेबिट कार्ड आमच्या ग्राहकांच्या पेमेंट अनुभवात लक्झरी व स्टाइलची भर घालते. हे कार्ड सर्वात उठून दिसावे या दृष्टीने तयार करण्यात आले आहे आणि आपल्या फर्स्ट प्रायव्हेट प्रोग्रॅमच्या एक्सक्लुसिव्हिटीशी सुसुंगत आहे. या क्षेत्रातील धातूचे पहिलेच डेबिट कार्ड असलेल्या फर्स्ट प्रायव्हेट इनफायनाइटने आमच्या कार्ड पोर्टफोलियोचा दर्जा व उत्कृष्टता यांची वरची पातळी गाठली आहे.

व्हिसाच्या इंडिया आणि दक्षिण आशियाचे ग्रुप कंट्री मॅनेजर टी. आर. रामचंद्रन म्हणाले, “फर्स्ट प्रायव्हेट मेटल डेबिट कार्डाच्या संपन्न डेबिट प्रपोझिशनन असलेल्या कार्डासाठी आयडीएफसी फर्स्ट बँकेशी भागीदारी करताना आम्हाला आनद झाला आहे. ट्रॅव्हल, आरोग्य व विमा, डायनिंग, मनोरंजन व लाइफस्टाइल क्षेत्रातील काळजीपूर्वक निश्चित केलेले लाभ आणि व्हिसा नेटवर्क व ब्रँडची शक्ती व वचन यांची सांगड घातल्यामुळे संपन्न भारतीय ग्राहक व कुटुंबांच्या इच्छांची पूर्तता होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *