महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ डिसेंबर ।जगभरात नव्या विषाणूने प्रचंड खळबळ माजली असून अनिश्चितता वाढली आहे. या भीतीने गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीकडे धाव घेतली आहे.आज सोने दरात १० रुपयांनी घसरले तर चांदीमध्ये २०० रुपयांची घट झाली आहे. एक किलो चांदीचा भाव ६१७०० रुपये असून त्यात २०० रुपये घट झाली आहे.
Goodreturns या वेबसाईटनुसार आज मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७११० रुपये इतका आहे. २४ कॅरेटचा भाव ४८११० रुपये आहे. त्यात १० रुपयांची घसरण झाली.