राज्यांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांना RT-PCR बंधनकारक?; राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ डिसेंबर । करोनाच्या नवीन स्वरूपाचा ओमायक्रॉन हा विषाणूनं (omicron virus) दक्षिण अफ्रिकेसह काही देशांत हाहाकार माजवला आहे. या विषाणूचा संसर्ग अधिक असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळं काही देशात पुन्हा कडक निर्बंध करण्यात आले आहेत. भारत सरकारनंही या बाबत त्वरित बैठक बोलावून सर्व राज्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. तर, राज्यांना, आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर प्रभावीपणे लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

परदेशातील भारतात येणाऱ्या प्रवाशांबाबत सरकारने सावध पावलं उचलली आहेत. अशातच राज्यांतर्गत प्रवास करणाऱ्यांवरही सरकारने निर्बंध आणले आहेत. याबाबत नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. यावर राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार देशातील ईतर राज्यातून महाराष्ट्रात विमानाने येणाऱ्या प्रवाशांना दोन डोस घेतलेले असताना RTPCR चाचणी बंधनकारक नसणार. पण, ओमायक्रॉनचा धोका असलेल्या देशांतून आलेल्या नागरिकांना RTPCR चाचणी सक्तीची असणार असून ७ दिवस क्वारंटाईन राहणं बंधंनकारक राहील, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

परदेशातून आलेल्या व्यक्तींना ७ दिवस क्वारंटाइन करावे लागेल. ७ दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यांची पुन्हा टेस्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या तरी एवढी ‘पॅनिक’ होण्याची गरज नाही, असे WHO ने सांगितले असले तरीही ओमिक्रॉनचा अहवाल आल्यानंतरच यासंबंधी निर्णय घ्यावा लागेल, असंही राजेश टोपे बोलले आहेत.

राज्यात ८२ टक्के पहिला डोस नागरिकांना देण्यात आला आहे. तर, ४४ टक्के लसीकरण दुसऱ्या डोसचं झालं आहे. साडेसात कोटी लोकांना पहिला डोस दिला असून साडेचार कोटी लोकांना दुसरा डोस दिला आहे. राज्यात लसीकरण वेगाने सुरु असून उदिष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत लसीकरण सुरूच राहील असंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.सद्या राज्यात लॉकडाऊन लावण्यासारख कोणतंही कारण नाही त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लावला जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, करोनाच्या नवीन स्वरूपाचा ओमायक्रॉन हा विषाणू आरटीपीसीआर आणि आरएटी चाचण्यांना चकवा देऊ शकत नाही हे अधोरेखित करतानाच, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी या विषाणूच्या जलद तपासासाठी आंतरराष्ट्रीय प्रवाशांची काटेकोर तपासणी आणि प्रभावी देखभाल करण्याचा सल्ला मंगळवारी केंद्र सरकारने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *