![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ डिसेंबर । अनेक वेळा सर्व आवश्यक परिश्रम आणि प्रयत्न करूनही आपल्याला नोकरी मिळू शकत नाही. ज्योतिष शास्त्रानुसार कुंडलीत ग्रहांच्या कमकुवत आणि वाईट स्थानामुळे असे होऊ शकते. पण अशा स्थितीत काही उपाय केल्याने तुम्हाला फायदा होईल.
करीअरमध्ये यश मिळवण्यासाठी उपाय
# तुमच्या नोकरीत आणि करिअरच्या चांगल्या संधीच्या शोधात असाल, तर तुम्ही दररोज किमान ३१ वेळा गायत्री मंत्र आणि महामृत्युंजय मंत्राचा पाठ करावा. यामुळे तुमच्यात सकारत्मकता तयार होते.
# दररोज सकाळी तांब्याच्या भांड्यात गूळ टाकून सूर्याला जल अर्पण करावे. करिअर आणि नोकरीसाठी हा एक जालीम उपाय मानला जातो.
# सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या दोन्ही तळव्यांकडे बघावे. असे म्हटले जाते की करामध्ये म्हणजेच हातामध्ये लक्ष्मीचा वास असतो. हा ज्योतिषीय उपाय केल्यास अमाप संपत्ती मिळण्यास मदत होते.
# नोकरी मिळण्यात सतत विलंब आणि अडथळे येत असल्यास गणेशीची आराधना करावी.या ज्योतिषीय उपायाने व्यक्तीचे करिअर स्थिर होण्यासही मदत होते.
# करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी भक्तीभावाने “ओम श्री हनुमंते नमः” या मंत्राचा २१ वेळा जप करा.
# सर्वात सोपा ज्योतिषीय उपाय म्हणजे उकडलेले तांदूळ कावळ्यांना देणे. हा उपाय शनि ग्रहाच्या अशुभ प्रभावांना शांत करण्यात मदत करेल.
(येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)