नारळ पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर पण अतिसेवन ठरू शकतं हानिकारक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ डिसेंबर । नारळ पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे तुम्ही नेहमीच ऐकले असेल. नारळ पाण्यामध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, ज्याचा आरोग्यासाठी फायदा होतो. याशिवाय नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स असतात ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होते. पण तुम्हाला माहीत आहे का? की काही वेळा नारळ पाणी पिणे आरोग्याला फायद्याऐवजी हानीकारक ठरू शकते. आज आपण नारळ पाणी पिण्याचे दुष्परिणाम (Side Effects of Coconut Water) जाणून घेऊयात.

तसे तर आपण केव्हाही नारळपाणी पीत असतो. मात्र, नारळपाणी पिण्यासाठीही वेळेची काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही योग्य वेळी नारळाच्या पाण्याचे सेवन केले नाही तर ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. सर्दीची लक्षणे असलेल्यांनी रात्री नारळ पाणी पिणे टाळावे.

नारळ पाणी पिण्याचे तोटे

लूज-मोशन

पोट बिघडले असल्यास तुम्ही जास्त नारळ पाणी पिऊ नये. यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढू शकते आणि तुमचे लूज मोशन आणखी वाढू शकते.

थंडी जाणवू शकते

काही लोकांना सर्दी लवकर होण्याचा त्रास होतो. जर तुम्हालाही थंड पदार्थ खाऊन सर्दी, सर्दीसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत असेल तर तुम्ही नारळ पाणी जास्त पिऊ नये. खरं तर, नारळाच्या पाण्याचा प्रभाव थंड असतो, त्यामुळे तुम्हाला थंडी जाणवू शकते.

रक्तदाब कमी होऊ शकतो

उच्च रक्तदाबासाठी औषध घेत असलेल्या लोकांनी नारळाचे पाणी जास्त पिऊ नये. नारळाच्या पाण्यात रक्तदाब कमी करण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे तुम्हाला कमी रक्तदाबाची समस्या होऊ शकते.

पोटाच्या समस्या वाढू शकतात

पोट फुगण्याच्या समस्येने त्रस्त असलेल्या आणि किडनीच्या समस्या असलेल्या लोकांनीही नारळ पाणी पिणे टाळावे. जर तुम्हाला नारळ पाणी पिण्याची आवड असेल तर तुम्ही यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यासोबतच तुम्ही कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया केली असल्यास. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर नारळ पाणी पिणे टाळावे. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात अडचणी येऊ शकतात.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. महाराष्ट्र २४ त्याची हमी देत नाही.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *