HDFC बँकेत खातं असणाऱ्या ग्राहकांना होणार जबरदस्त फायदा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ डिसेंबर । देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या HDFC बँकेने ग्राहकांना मुदत ठेवींवरील व्याजदरात (Fixed Deposit) वाढ केली आहे. पुढील आठवड्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या द्वि-मासिक चलनविषयक धोरण पुनरावलोकनाच्या (RBI MPC Meeting) एक आठवडा अगोदर ही दरवाढ करण्यात आली आहे. एचडीएफसी बँकेने एकाधिक मुदतीच्या एफडीवर 10 बेसिस पॉइंट्सपर्यंत दर वाढवले ​​आहेत HDFC बँक आपल्या ग्राहकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी मुदत ठेव (FD) सुविधा देते. याशिवाय. HDFC बँक ज्येष्ठ नागरिकांना FD (RBI MPC Meeting)वर अतिरिक्त व्याज देखील देते.

याशिवाय बँक ज्येष्ठ नागरिकांना 0.25 टक्के अधिक व्याज देत आहे. एखाद्याने ऑनलाइन एफडी केली तरी त्याला अधिक फायदे मिळतील. बँक 0.10 टक्के अधिक व्याज देत आहे. यापूर्वी, ग्राहकांना 36 आणि 60 महिन्यांच्या एफडीवर 6.05 टक्के आणि 6.4 टक्के दराने व्याज मिळत होते.

याशिवाय, ICICI बँकेने 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या FD वरील व्याजदरातही सुधारणा केली आहे. बँकेने म्हटले आहे की सुधारित व्याजदर नवीन आणि विद्यमान एफडीवर लागू होतील.

ICICI बँक किमान सात दिवसांच्या कालावधीसह FD गुंतवणूक ऑफर करते. खाते उघडल्यानंतर सात दिवसांपेक्षा कमी कालावधीत ठेव काढल्यास, ग्राहकाला कोणतेही व्याज मिळत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *