येत्या २ वर्षांत धावणार दहा मोनो; नव्या ट्रेनची निर्मिती भारतात होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ डिसेंबर । मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मोनोरेलच्या कार्यप्रणालीसाठी पुरेसे मनुष्यबळ तैनात केले आहे. स्पेअर पार्टच्या उर्वरित साहित्यासाठीच्या खरेदीसाठी आणि आवश्यक उपकरणांकरिता प्राधिकरणाकडून वेगाने कार्यप्रणाली राबविली जात आहे. नव्या १० ट्रेनच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रियादेखील पूर्ण झाली आहे. या नव्या ट्रेनची निर्मिती आत्मनिर्भर भारत या अभियानांतर्गत भारतात होणार आहे. पुढील दोन वर्षे चार महिन्यांत त्या ट्रेन सुरू होणार आहेत.

मोनोरेलसाठीच्या पहिल्या कंत्राटदाराने कंत्राटानुसार १५ ट्रेनच्या तुलनेत केवळ ७ ट्रेनची मागणी पूर्ण केली होती. ७ पैकी केवळ ३ ट्रेन प्राधिकरणाने कार्यभार हाती घेतला तेव्हा कार्यान्वित होत्या. प्राधिकरणाने स्वदेशी स्पेअर पार्ट्सचा वापर करत इन हाऊस ४ ट्रेनची निर्मिती केली. त्या ट्रेन १८ मिनिटांच्या फ्रिक्वेन्सीवर धावत आहेत. नव्या १० ट्रेनच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रियादेखील पूर्ण झाली आहे.

प्राधिकरण कोरोनाच्या सगळ्या नियमांचे पालन करत असून, मोनोरेल चालविल्या जात आहेत. वेळोवेळी मोनोरेल, स्थानकांना स्वच्छ केले जात आहे. सामाजिक अंतर पाळले जात आहे. प्रवाशांच्या आरोग्याच्या सुरक्षेचा विचार करता क्यूआर कोड तिकिटासारखी प्रणाली राबविली जात आहे. जेणेकरून संसर्ग होणार नाही.

कुठे धावते मोनो

चेंबूर – वडाळा – संत गाडगे महाराज चौक

केव्हा येणार नवी मोनो

१) जानेवारी २०२३ पर्यंत मोनोरेलची पहिली गाडी मुंबईत दाखल होईल.

२) जानेवारी २०२४ पर्यंत मोनोरेलची दुसरी गाडी दाखल होईल.

कोणाला मिळाले टेंडर

१) मेधा सर्व्हो ड्राइव्हस प्रायव्हेट लिमिटेडला याबाबतचे टेंडर मिळाले.

प्रकल्पाची किंमत किती?

१) संपूर्ण प्रकल्पाच्या कामाची किंमत ५९० कोटी रुपये आहे.

किती किलोमीटर धावते मोनो

१) आजघडीला मोनोरेल वीस किलोमीटर मार्गावर धावत आहे.

२) भविष्यात मोनोरेल मेट्रो रेल्वेला जोडली जाणार आहे.

किती प्रवासी प्रवास करतात

१) एका मोनोरेलमधून एका तासाला ७ हजार ५०० प्रवाशांना प्रवास करता येत आहे.

२) दिवसाला मोनोरेलमधून एक लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करू शकतात.

३) २०३१ पर्यंत ही संख्या २ लाख होईल.

४) २०४१ पर्यंत हा आकडा ३ लाख होईल.

कशी असणार नवी मोनो

१) वजनाने कमी

२) मोनोरेलमधून एका वेळी ५६० प्रवासी प्रवास करणार

३) देखभाल दुरुस्ती खर्च कमी

४) आयुष्य अधिक

५) मोनोरेलची बांधणी स्टेनलेस स्टीलने

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *