भाजपकडून राज्यसभेसाठी भागवत कराड यांना उमेदवारी

Spread the love

महाराष्ट्र २४ – औरंगाबाद : भाजपने महाराष्ट्रातून राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी माजी महापौर आणि राज्य उपाध्यक्ष भागवत कराड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर विधानपरिषदेसाठी अमरीश पटेल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भागवत कराड हे गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे यांचे यांचे निकटवर्तीय मानले जातात. दरम्यान, भाजप नेते एकनाथ खडसे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. अखेर खडसेंना उमेदवारी मिळाली नाहीच.

सध्या मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ अध्यक्ष आहे. पेशाने डॉक्टर असणारे भागवत कराड यांची वंजारी समाजाचा नेता म्हणून ओळख आहे. औरंगाबाद भाजप मजबूत करण्यासाठी आणि शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपकडून ही उमेदवारी दिल्याची चर्चा आहे. राज्यसभेच्या ५५ जागांसाठी येत्या २६ मार्च रोजी निवडणूक होणार आहे. त्याच दिवशी त्याची मतमोजणी होणार आहे. राज्यात एकूण सात जागांसाठी निवडणूक होत असून विधानसभेतील संख्याबळानुसार महाविकास आघाडीच्या चार आणि भाजपच्या तीन जागा निवडून येऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *