पुण्यातील चार मेडिकल्सना औषधी खरेदी आणि विक्री करण्यावर निर्बंध घालत अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली ; कोरोनाचा फायदा घेत पैसे उकळण्याची हौस पडली महागात

Spread the love

महाराष्ट्र २४  पुणे,  : कोरोना व्हायरसची लागन होऊ नये यासाठी नागरिक मेडिकलमधून सॅनिटायझर आणि मास्क खरेदी करत आहेत. मात्र अनेक मेडिकल या वस्तूंची दुप्पट किंमत वसूल करत नागरिकांची लूट करत आहेत. तर अनेक मेडिकलमध्ये या वस्तूंची बनावट उत्पादनेही विकली जात असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर अन्न आणि औषध विभागाने कारवाईसाठी पथक रवाना करत पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात आत्ता पर्यंत तब्बल 165 मेडिकल्सची तपासणी केली.

कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे लोकांची चिंता वाढलेली असतानाच वाढीव दराने मास्क आणि सॅनिटायजर विकलं जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. अशाच प्रकाराबाबत मिळालेल्या तक्रारची गंभीर दखल घेत पुण्यातील चार मेडिकल्सना औषधी खरेदी आणि विक्री करण्यावर निर्बंध घालत अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.

तपासणी करण्यात आलेल्या मेडिकल्सपैकी कोथरूड परिसरातील न्यू पूजा मेडिकल आणि मेट्रो मेडिकल तर गोखले नगर परिसरातील ओम केमिस्ट् आणि म्हाळुंगे येथील महालक्ष्मी मेडिकल या चार मेडिकल्सना खरेदी विक्री करण्याचे निर्बंध घातले असून अशा वाढीव दराने कुणी मास्क आणि सॅनिटायझरची विक्री करत असल्यास त्यांनी त्वरित अन्न आणि औषध विभागाशी संपर्क साधवा. संबधित मेडिकल वर छापा टाकून त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन अन्न आणि औषध विभागाचे सहआयुक्त सुरेश पाटील यांनी दिलं आहे.
दरम्यान, पुण्यात आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने तेथील कोरोनाग्रस्तांची संख्या 9 झाली आहे. महाराष्ट्रात आता कोरोना बाधितांची संख्या 14 झाली आहे. दुबईहून आलेल्या एका दांपत्याला पुण्यात प्रथम कोरोना व्हायरस असल्याचं उघड झालं. त्यांच्या संपर्कात आलेल्या आणखी काही जण कोरोना पॉझिटिव्ह सिद्ध झाले. आज सापडलेला रुग्ण अमेरिकेहून नुकताच पुण्यात आल्याचं उघड झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *