महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ डिसेंबर । सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. दरम्यान आज 07 डिसेंबर रोजी देखील इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर आहेत. आज मुंबईत पेट्रोलचा भाव 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. अर्थात जरी पेट्रोल-डिझेलचे दर बदलले नसले तरीही आजचे दर सामान्यांच्या खिशाला चाप बसवणारेच आहेत.
मुंबईच्या तुलनेत राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर कमी आहेत. याठिकाणी केजरीवाल सरकारने पेट्रोलवरील वॅटमध्ये कपात (Kejriwal Government slashes vat on petrol) करण्यााच निर्णय घेतला होता. परिणामी दिल्लीत पेट्रोल 8 रुपयांनी स्वस्त झालं आहे. दिल्लीमध्ये आज 1 लीटर पेट्रोलचा भाव 103.93 रुपयांवरून कमी होऊन 95.41 रुपये प्रति लीटर झाला आहे.
>> दिल्ली पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर
>> मुंबई पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर
>> चेन्नई पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर
>> कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर