उर्वरीत दोन्ही वन-डे प्रेक्षकांच्या गैरहजेरीत

Spread the love

महाराष्ट्र २४-मुंबई :  भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात होत असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला आहे. मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना लखनौमध्ये १५ मार्चला व तिसरा सामना १८ मार्चला कोलकाता येथे होणार आहे. मात्र, हे दोन्ही सामने मैदानातील प्रेक्षकांशिवाय खेळवले जाणार आहेत.पहाटे तीनपासून पावसाला सुरुवात झाली. दिवसभरात पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. काहीवेळे उघडीपही घेतली. मात्र, ढगाळ वातावरण आणि मैदान ओले असल्याने अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्राने ही कडक पावले उचलली आहेत. लखनौ व कोलकाता येथील उर्वरीत दोन्ही सामने रिक्त स्टेडियममध्ये व्हायला हवेत, असा सल्ला केंद्र सरकारने बीसीसीआयला दिला आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना धर्मशाला येथे खेळला जाणार होता. परंतु, पावसामुळे एकही चेंडू न खेळता हा सामना रद्द करण्यात आला.

कोरोनाच्या कहरातून सर्वसामान्यांना वाचवण्यासाठी राज्य सरकार किंवा देशाचे सरकार सुरक्षेच्या दृष्टीने शक्यती सर्व पावले उचलत आहेत. आता भारत सरकारने बीसीसीआयला सल्ला दिला आहे की, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पुढील दोन सामन्यांचे प्रेक्षकांविनाच आयोजन करावे.

क्रीडा मंत्रालयाने देशातील सर्व क्रीडा महासंघ आणि बीसीसीआय यांना आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांचे पालन करण्यास सांगितले आहे. तसेच, क्रीडा स्पर्धेदरम्यान मोठ्या संख्येने लोकांना एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी सांगितले आहे. कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन काम केले पाहिजे, अशा सूचनाही केल्या आहेतमध्ये हे नवीन रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, कलबुर्गी येथील ७६ वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला होता. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीअंती सिद्ध झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *