उद्यापासून क्रिकेटचा महासंग्राम; जाणून घ्या भारतात कुठे, किती वाजता पाहू शकता सामने

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .७ डिसेंबर । कसोटी क्रिकेटमधील सर्वात जुनी लढत उद्या म्हणजेच ८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशस मालिकेला उद्या सुरूवात होणार असून ही मालिका ४२ दिवस चालेल. ऑस्ट्रेलियाचा संघ यावेळी नव्या कर्णधारासह म्हणजेच पॅट कमिन्ससह मैदानात उतरले.

अ‍ॅशेस मालिका ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात होत असली तरी संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष या मालिकेवर असते. भारतात देखील ही मालिका पाहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या वर्षी अ‍ॅशेस मालिका ऑस्ट्रेलियात होत आहे. उद्या बुधवारी पहिली कसोटी ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर सुरू होईल. भारतीय वेळेनुसार पहाटे ५.३० वाजता सामना सुरू होईल.

कुठे पाहाल सामना

द अ‍ॅशेसमधील सर्व सामने तुम्ही सोनी नेटवर्कवर पाहू शकता. त्याच बरोबर त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्ह अ‍ॅपवर पाहू शकता.

पहिल्या सामन्यासाठी असा आहे ऑस्ट्रेलियाचा संघ- डेव्हिड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमरून ग्रीन, एलेक्स कॅरी, पॅट कमिन्स (कर्णधार), मिशेल स्टार्क, नाथन लायन, जोश हेजलवुड

वाचा- दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याआधी धक्क्यासाठी तयार रहा; टीम इंडियात होणार ५ मोठे बदल

 

इंग्लंडचा संघ- जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, जोस बटलर, हसीब हमीद, डेव्हिड मलान, ओली पोप, स्टुअर्ट ब्रॅड, जॅक लीच, बेन स्टोक्स, क्रिस वोक्स, ओली रॉबिन्सन, मार्क वुड

पहिल्या कसोटी सामन्याच्या आधी इंग्लंडला एक मोठा धक्का बसला आहे. अनुभवी जलद गोलंदाज जेम्स अ‍ॅडरसन याला दुखापत झाली असून तो गाबा कसोटीत खेळणार नाही. पण बेन स्टोक्स हा वर्ल्डकप विजेता खेळाडू संघात परतला आहे.

वेळापत्रक-

पहिली कसोटी- ८ ते १२ डिसेंबर, गाबा
दुसरी कसोटी-१६ ते २० डिसेंबर, एडिलेड
तिसरी कसोटी- २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न
चौथी कसोटी- ५ ते ९ जानेवारी, सिडनी
पाचवी कसोटी- १४ ते १८ जानेवारी, ठिकाण अद्याप निश्चित नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *