नशीबवान ; ‘देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो,’ ! खोदकामात मजुराला सापडला मौल्यवान हिरा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .८ डिसेंबर । ‘देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो,’ ही म्हण मध्य प्रदेशातील एका मजुराच्या बाबतीत तंतोतंत खरी ठरली आहे. या मजुराला खोदकामादरम्यान 13 कॅरेटचा एक हिरा सापडला असून रातोरात त्याचे नशीब पालटले आहे. या हिऱयाची अंदाजे किंमत 60 लाख रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे.

पन्नाच्या भूमीमधून नेहमीच सुंदर हिरे सापडतात. सोमवारी आदिवासी शेतकरी मुलायम सिंह याला 13 कॅरेटला हिरा सापडला. हा हिरा पाहून त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. पुढच्या लिलावात या हिऱयाची विक्री करण्यात येणार आहे. या लिलावातून जो पैसा येईल त्यातून 12 टक्के रक्कम कापून उर्वरित रक्कम मुलायम सिंह यांना देण्यात येईल, असे हिऱयांची पारख करणारे जवाहीर अनुपम सिंह यांनी सांगितले. दरम्यान, हिऱयाच्या विक्रीतून मिळणाऱया पैशांमधून मुलांचे शिक्षण करणार असल्याचे मुलायम सिंह यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *