Ashes: कमिन्सच्या वेगवान गोलंदाजीपुढे इंग्लंडचे लोटांगण ; पॅटच्या नावावर नवा रेकॉर्ड

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .८ डिसेंबर । ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUS vs ENG) यांच्यातील प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या अॅशेस कसोटी (Ashesh Series 2021) मालिकेला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने सुरवातीलाच सामन्यावर आपली पकड मिळवली आहे. ब्रिस्बेन येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 147 धावांत गुंडाळला. कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच ऑस्ट्रेलियाचे कर्णधार पद भुषवणाऱ्या पॅट कमिन्सने (Pat Cummins) गोलंदाजीत आपली करामत दाखवत 5 बळी घेतले.

इंग्लंडचा सलामीवीर रॉरी बर्न्स, कर्णधार जो रूट आणि ऑली रॉबिन्सन खाते न उघडता बाद झाले. डेव्हिड मलान (06), बेन स्टोक्स (05), मार्क वुड (08), जॅक लीच (02) यांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. जोस बटलरने महत्त्वाची खेळी खेळली. त्याने 58 चेंडूत 39 धावा केल्या. हसीब हमीदने 25 धावांची खेळी खेळली. ओली पोपने 35 धावा केल्या. एका क्षणी संघ 100 धावांचा टप्पाही पार करणार नाही असे वाटत होते, पण बटलर आणि नंतर ऑली पोपच्या महत्त्वपूर्ण खेळीने संघाला 147 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आले आहे.

कर्णधार पॅट कमिन्सने पाच बळी घेत इतिहास रचला. पदार्पणाच्या कसोटीत अशी कामगिरी करणारा तो दुसरा ऑस्ट्रेलियन कर्णधार ठरला आहे. पॅट कमिन्सने बेन स्टोक्सच्या रूपात सामन्यातील पहिली विकेट घेतली. त्यानंतर त्याने हसीब हमीद, ख्रिस वोक्स, ऑली रॉबिन्सन आणि मार्क वूडचा पाच बळी घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *