महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .८ डिसेंबर । भारताचे पहिलेच संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांचं आज तामिळनाडूत झालेल्या भीषण हेलिकॉप्टर अपघातानंतर मृत्यू झाला आहे. जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूनं भारतच नाही तर पाकिस्तानातही हळहळ व्यक्त केली जातेय.
पाकिस्तानचे ‘जॉईंट चीफ ऑफ स्टाफ कमिटी’ (CJCSC) प्रमुख जनरल नदीम रझा तसंच पाकिस्तानचे लष्करप्रमुख (COAS) जनरल कमर जावेद बाजवा यांनी भारतीय संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. पाकिस्तान सशस्त्र दलाचे प्रवक्त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून अधिकृतरित्या ही माहिती देण्यात आलीय.