राज्यात डिसेंबरनंतर पुन्हा पावसासह गारपिटीची शक्यता

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .९ डिसेंबर । राज्यातील अनेक ठिकाणी गुरुवारनंतर गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिमी वाऱ्याचा प्रभावामुळे गुरूवारनंतर वातावरणात पुन्हा बदल होणार असून, विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण असणार आहे. त्यात थंडी, धुके पावसाबरोबरच गारा देखील कोसळतील असा अंदाज आहे.

दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात आदी राज्यासह महाराष्ट्र देखील गारपीट होऊ शकते, असा अंदाज भौतीकशास्त्राचे अभ्यासक प्रा. किरणकुमार जोहरे यांनी व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांनी काढलेले पिके सुरक्षित ठिकाणी न्यावे जेणेकरून नुकसान टाळता येईल.

गारांचा आकार पूर्वीपेक्षा वाढला
किरणकुमार जोहर म्हणाले, की पुढील तीन महिन्यात राज्यातील अनेक भागांना कमी-अधिक प्रमाणात क्युमोलोनिंबस ढगांची निर्मिती होत आहे. जेणेकरून गारपिटीचा व गारांसह पावसाला शेतीसह अर्थव्यवस्थेला सामोरे जावे लागेल. पश्चिम महाराष्ट्रात गारपिटीचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.

पश्चिमी वारे अथवा पश्चिमी प्रक्षोभमुळे येणारा गारवा आणि भौगोलिक प्रदेशानुसार असलेले बाष्प व तापमानातील चढ-उताराच्या प्रभावामुळे वातावरणात घुसळण निर्माण होऊन वातावरणातील अस्थिरतेने क्युमोलोनिंबस ढगांची निर्मिती होते. गडगडाटासह डिसेंबरमध्ये पुन्हा पाऊस होऊ शकतो, असे किरणकुमार जोहर यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *