![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .९ डिसेंबर । एलपीजी सिलिंडर स्वस्त होण्याच्या अपेक्षेला पुन्हा एकदा झटका बसला असून १ डिसेंबरपासून व्यावसायिक गॅस सिलिंडर १०० रुपयांनी महाग झाला आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता मोदी सरकार पेट्रोल, डिझेलप्रमाणे गॅसही स्वस्त करेल, अशी लोकांना अपेक्षा होती. सामान्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे ही वाढ केवळ व्यावसायिक सिलेंडरच्या दरांमध्ये झाली आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ही वाढ केली असून गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडर २६६ रुपयांनी महागला होता, आता त्यात १०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
व्यावसायिक गॅस सिलंडरचे दर
जानेवारी १३४४.५२
फेब्रुवारी -१५५६
मार्च १६४१.६७
एप्रिल – १६७०.२५
मे – १६७०.२५
जून- १६७०.२५
जुलै – १५८२.३५
ऑगस्ट -१६५३.२
सप्टेंबर -१७३२
ऑक्टोबर -१७६७.२
नोव्हेंबर – २०५३
१३०० चा सिलिंडर २ हजार १५३ वर पोहचला
व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती गेल्या डिसेंबर २०२० मध्ये साधारणपणे १३०० रुपयांपर्यंत होत्या. परंतु , या सिलिंडरच्या किमतीत एका वर्षात तब्बल आठशे रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे.