Ashes 2021 : रूट आणि मलान च्या चिवट फलंदाजी ने इंग्लंडचे जोरदार कमबॅक ;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० डिसेंबर । ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (ENGvsAUS) यांच्यात गब्बा येथे खेळल्या जात असलेल्या अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. आज इंग्लिश फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४२५ धावांवर आटोपला आणि त्यांनी २७८ धावांची आघाडी घेतली. प्रत्युत्तरात मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाने दुसऱ्या डावात २ बाद २२० धावा केल्या, पण इंग्लंडचा संघ अजूनही ५८ धावांनी पिछाडीवर आहे. डेव्हिड मलान (८०) आणि जो रूट (८६) हे नाबाद आहेत.

दुसऱ्या दिवशीच्या ७ बाद ३४३ धावसंख्येवरून पुढे तिसऱ्या दिवशी खेळण्यास ऑस्ट्रेलिया संघाने सुरवात केली आणि संघाचे उर्वरित खेळाडू ८२ धावा जोडून माघारी परतले. कालचे नाबाद फलंदाज ट्रॅव्हिस हेड आणि स्टार्कने आठव्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी केली. ख्रिस वोक्सने स्टार्कला (३५) बाद करून ही जोडी फोडली. हेडही १५२ धावांवर बाद झाला. मार्क वुड आणि ओली रॉबिन्सन यांनी इंग्लंडकडून प्रत्येकी ३-३ बळी घेतले.

इंग्लंडच्या दुसऱ्या डावाचीही सुरुवातही खराब झाली आणि संघाला २३ धावांवर रॉरी बर्न्सच्या रूपाने पहिला धक्का बसला. १३ धावा करून बर्न्स कमिन्सचा बळी ठरला. हसीब हमीद चांगली फलंदाजी करत होता, पण त्यालाही २७ धावांवर स्टार्कने बाद केले. यानंतर डेव्हिड मलान आणि जो रूट या जोडीने शानदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला संधीच दिली नाही. दोन्ही फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी १५९ धावांची नाबाद भागीदारी केली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने ७० षटकांत २ गडी गमावून २२० धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडे पहिल्या डावाच्या जोरावर ५८ धावांची आघाडी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *