रॉयल एनफिल्डने लाँच केली सर्वात स्वस्त बुलेट, जाणून घ्या किंमत

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .११ डिसेंबर । काही दिवसांपुर्वीच रॉयल एनफिल्डच्या सर्वात स्वस्त बुलेटचा फोटो लीक झाला होता. आता या बुलेटची किंमत समोर आली आहे. लीक झालेल्या रिपोर्टनुसार, बुलेट 350 एक्स (Bullet 350 X) ची किंमत 1.12 लाख आणि इलेक्ट्रिक स्टार्ट वर्जन बुलेट ईएस 350 एक्सची किंमत 1.21 लाख रूपये आहे. सध्या बाजारात असलेल्या बुलेटच्या किंमतींपेक्षा या बुलेटची किंमत 14 हजार रूपयांनी कमी आहे.

या दोन्ही बुलेटना दोन वेगवेगळ्या टप्प्याच लाँच केले जाणार आहे. या नवीन बुलेटला आधीच्या बुलेटपेक्षा वेगळे ठेवण्यासाठी कॉस्मिक बदल करण्यात आले आहे. ज्यामध्ये बाईकच्या अनेक भागांवर ब्लँक फिनिशिंग देण्यात आली आहे. याचबरोबर या बाईकमध्ये स्पोक वील्जचा पर्याय देखील देण्यात आला आहे.

या बाईकमध्ये 350 सीसी, एअर-कुल्ड, सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, याचप्रमाणे 500 सीसी व्हर्जन देखील लवकरच बाजारात येणार असून, त्याची किंमत देखील कमी असणार आहे.

या बाईकमध्ये ट्यूब टायरबरोबरच स्पोक वील्ज देखील असतील. किक स्टार्ट आणि इलेक्ट्रिक स्टार्ट हे दोन्ही पर्याय असतील. मॅकेनिकली ही बुलेट आधीच्या 350 बुलेट प्रमाणेच असेल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *