महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१२ डिसेंबर । प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा कालावधी मार्च 2022 पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे गरिबांना आता होळीच्या पुढे ही मोफत रेशन मिळणार आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून यासंदर्भात निवेदन जारी करण्यात आले आहे.
या निवेदनात पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे की, कोरोना काळात कोणताही गरीब उपाशी राहणार नाही, यासाठी आम्ही मार्च 2020 मध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना सुरू केली. सुरुवातीला 3 महिने व नंतर 5 महिन्यांसाठी वाढवण्यात आलेली ही योजना नोव्हेंबरमध्ये समाप्त होत होती. आता या मोफत रेशन योजनेचा कालावधी आम्ही मार्च 2022 पर्यंत वाढवत आहे. 24 नोव्हेंबरला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयाची अंमलबजावणी आता होणार आहे.
या योजनेअंतर्गत 80 करोडहून अधिक लोकांना दरमहा 5 किलो मोफत गहू / तांदूळ आणि प्रत्येक कुटुंबाला 1 किलो मोफत हरभरा दिला जात आहे. लाभार्थ्यांना रेशन दुकानातून अनुदानित धान्याव्यतिरिक्त मोफत रेशन दिले जाते.