आफ्रिका दौऱ्यासह तुमच्या करिअरचा शेवट; BCCIने या खेळाडूंना दिला अल्टिमेटम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१२ डिसेंबर । भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा सुरू होण्याआधीच चर्चेत आला आहे. या दौऱ्याआधी बीसीसीआयने काही मोठे निर्णय घेतले ज्यामुळे भारतीय क्रिकेटवर त्याचा पुढील काही वर्षात प्रभाव दिसेल. बीसीसीआयने वनडेचे कर्णधारपद विराट कोहलीकडून काढून घेतले आणि रोहित शर्माकडे दिले. तो आता टी-२० आणि वनडे संघाचे नेतृत्व करेल. तर कसोटीमध्ये उपकर्णधार असलेल्या अजिंक्य रहाणेच्या जागी रोहितची नियुक्ती केली. या काही बदलानंतर आता भारतीय क्रिकेट संघातील तिघा सिनिअर खेळाडूबाबत नवी अपडेट समोर येत आहे.

भारतीय संघातील अनुभवी जलद गोलंदाज इशांत शर्माचा दक्षिण आफ्रिका दौरा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय दौरा असू शकतो. संघातील युवा गोलंदाज चांगली कामगिरी करत असताना आता निवड समितीने ३३ वर्षीय इशांतला पुढील विचार करण्यास सांगितले आहे. गेल्या काही वर्षात इशांत विकेट घेण्यास संघर्ष करताना दिसतोय. इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्यासाठी देखील आफ्रिका दौरा निर्णायक ठरू शकतो. अजिंक्यकडून उपकर्णधापद काढून घेण्यात आले आहे. त्याची या वर्षातील सरासरी २०च्या खाली आहे. पुजाराला देखील फार चांगली कामगिरी करून दाखवता आलेली नाही.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात जर हे दोन्ही फलंदाज अपयशी ठरले तर त्यांच्या करियरला पूर्णविराम मिळू शकतो. बीसीसीआयमधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, उपकर्णधारपदावरून दूर करणे हा राहणेसाठी एक इशारा आहे. आता त्याला संघात अनुभवी खेळाडू म्हणून योगदान द्यावे लागले. जर त्याने या मालिकेत चांगली कामगिरी केली तर तो कसोटी करिअर पुढे घेऊन जाऊ शकतो. इशांत शर्मासाठी तर ही अखेरची मालिका असणार आहे.

निवड समितीने हे देखील स्पष्टपणे सांगितले आहे की, फक्त ४०-५० धावांची खेळी पुजारा- रहाणे यांचे करिअर वाचवण्यासाठी पुरेशी ठरणार नाही. फक्त मोठी खेळी त्यांना वाचवू शकते. कसोटी करिअर पुढे नेण्यासाठी त्यांना त्यांना मोठी धावसंख्या करावी लागले, असे अधिकाऱ्याने सांगितले.

श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी यांच्या कामगिरीमुळे पुजार आणि रहाणे यांच्यावर दबाव वाढला आहे. अय्यरने पदार्पणाच्या कसोटीत शतक आणि अर्धशतक केले. तर भारत अ कडून खेळताना आफ्रिकेच्या दौऱ्यात विहारीने ७५.६७ च्या सरासरीने २२७ धावा केल्या आहेत. दरम्यान इशांत आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत विकेट घेता आली नाही. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत त्याला संधी मिळाली नाही. एकेकाळी इशांत गोलंदाजीचे नेतृत्व करत होता. पण गेल्या काही वर्षात ती जागा जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी घेतली आहे. उमेश यादव हा देखील आघाडीवर आहे. शर्माच्या पुढे पुजारा आणि रहाणे यांच्यापेक्षा अधिक स्पर्धा आहे. मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर सारखे खेळाडू मॅच विजेता ठरत आहेत. त्याच बरोबर नवदीप सैनी आणि प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान ही देखील नावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *