महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ डिसेंबर । मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai Pune Express Way) वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे. जवळपास २ किलोमीटरपर्यंत रांग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यामध्ये मुंबईकडून (Mumbai) पुण्याकडे (Pune) येणाऱ्या मार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याकडे येणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली आहे. दोन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून दरड कोसळली असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मात्र पुण्याकडे येणारा रस्ता बंद असल्यामुळे लांबच लांब रांगा लागल्याचं दिसत आहे.