आज या राशींना दिवस फायदेशीर ; पहा आजचे राशिभविष्य ​

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१५ डिसेंबर ।

मेष:-
आज कामाच्या ठिकाणी चांगला समन्वय साधला जाईल. स्वभावातही चांगले बदल दिसून येतील. चारचौघात तुमचा प्रभाव पडेल. वडिलांचा मोलाचा सल्ला मिळेल. सर्व कामांचा ताळमेळ साधावा.

वृषभ:-
आज नशीब आजमावण्याची संधी मिळेल. आज सुरू केलेले काम फायदेशीर ठरेल. मनात परोपकाराची भावना जपाल. धार्मिक स्थळाला भेट द्याल. थोरांचा आशीर्वाद मिळेल.

मिथुन:-
आज मनाची चलबिचलता जाणवेल. एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. जुन्या विचारात अडकून पडू नका. अचानक धनलाभाची शक्यता. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

कर्क:-
आज वैवाहिक जीवनात अनुकूलता येईल. मनातील इच्छा पूर्ण कराल. फार हट्टीपणा करू नका. कुटुंबातील व्यक्तींशी चर्चेला अधिक प्राधान्य द्यावे. जनसंपर्क वाढेल.

सिंह:-
आज आरोग्याकडे लक्ष द्यावे. पोटाचे त्रास संभवतात. वातूळ पदार्थ खाणे टाळावे. हित शत्रूपासून सावध राहावे. योग साधनेवर भर द्यावा. जेष्टांचा सल्ला घ्या .

कन्या:-
आजचा दिवस मजेत घालवाल. चांगले शैक्षणिक परिणाम मिळतील. प्रेम जीवनाला बहर येईल. जुगारातून लाभ संभवतो. मित्रांसोबत फिरायला जाल.आरोग्य सांभाळा.

तूळ:-
आज उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. घराची साफसफाई कराल. दिवस प्रसन्नतेत जाईल. घरच्यांशी सुसंवाद साधाल. जवळचा प्रवास कराल.अचानक धनलाभ होईल .

वृश्चिक:-
आज सामाजिक स्तरावर सक्रिय राहाल. स्वभावात सौम्यता ठेवावी. मित्रांशी सलोखा वाढेल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. आपले मत स्पष्टपणे मांडाल. व्यवसायात फायदा होईल.

धनू:-
आज गोड बोलून कामे करून घ्याल. सर्वांची आपुलकीने चौकशी कराल. मनातील कडवटपणा दूर करता येईल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. वडिलोपार्जित कामातून लाभ संभवतो.

मकर:-
आज आरोग्यात सुधारणा होईल. मानसिक स्थैर्य लाभेल. आवडीच्या कामात मन गुंतवावे. समोरील अडचण सहज दूर करू शकाल. हातातील कामातून यश येईल.

कुंभ:-
आज कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे. राजकारणापासून दूर राहावे. अनावश्यक खर्च टाळावा. दूरच्या कामातून लाभ संभवतो. मनात चुकीच्या विचारांना थारा देऊ नका.

मीन:-
आज नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल. जवळच्या मित्राजवळ मन मोकळे करावे. कामे जलद गतीने पूर्ण होतील. व्यापारी वर्ग खुश असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *