महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ डिसेंबर । प्रायव्हेट चॅट सुरक्षित रहावं यासाठी व्हॉट्स ऍप सध्या एका भन्नाट फिचरवर काम करतंय. त्यामुळे एखाद्या युजरशी तुम्ही बोलत असताना त्याने स्क्रिनशॉट घेतल्यास आता तुम्हाला नोटीफिकेशन येणार आहे. चॅटिंग करण-या दोन युजरपैकी एका युजरनं चॅटचा स्क्रीनशॉट घेतला तर व्हॉट्सऍप समोरच्या व्यक्तीला याबाबत नोटिफिकेशन पाठवणारेय. समोरच्या व्यक्तीनं चॅटचा स्क्रीनशॉट घेतला तर यापुढे तीन ब्लू टिक दिसतील.
सध्या आपल्याला कोणासोबत ही संभाषण करायचे झाले तरी आपण डिजिटल पद्धतीनेच ते करतो. बऱ्याचदा असे ही होते की, आपण आपल्या समोर असलेल्या व्यक्तीसोबत देखील समोरासमोर संभाषण न करता डिजिटल पद्धतीने करतो.परंतु जी मज्जा समोरासमोर गप्पा मारण्यात आहे, ती डिजिटल पद्धतीने गप्पा मारण्यात नाही. तसेच समोरासमोर बोललेली गोष्ट ही त्या दोन व्यक्तींमध्येच राहते.परंतु तिच गोष्ट जर आपण डिजिटल प्लॅटफॉर्मवरती एकमेकांना सांगितली, तर त्याचा पुरावा मागे राहतो. ज्यामुळे कोणतीही तिसरी व्यक्ती त्याला वाचू शकते.त्यामुळे डिजिटल प्लॅटफॉर्मवरती लोकं मनमोकळे पणाने बोलत नाहीत. आपण संभाषण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात व्हॉट्सअॅप वापरतो. व्हॉट्सअॅपचे जगभरात लाखोंपेक्षा जास्त युजर्स आहेत. त्यामुळे व्हॉट्सअॅप आपल्या ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो आणि नवनवीन फीचर्स अॅड करत असतो.