महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ डिसेंबर । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आगामी काळातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचं काम ते या दौऱ्यातून करत असल्याचं दिसतं आहे. राज ठाकरे यांनी आज औरंगाबादमध्ये (Aurangabad) पत्रकारांशी संवाद साधत वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडेल असं वाटत नसल्याचं सांगितलं.
राज्याची प्रकृती ठीक नाही, त्याला कारण राज्याला तीन डॉक्टर आहे असं म्हणत त्यांनी पेपरफुटी आणि ओबीसी आरक्षणावरून चिंता व्यक्त केली. तसेच राज्यात जे सरकार आहे ते सध्या पडेल असं वाटत नसल्याचं राज ठाकरे म्हणाले आहेत.
राज ठाकरे यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधताना़ राज्यातील आणि देशातील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. मुळ विषय बाजूला ठेवून, इतर विषय दाखवले जातात. माध्यमांचाही वापर केला जातो, त्यातून आर्यन खान प्रकरण, वाझे सारखे प्रकरण दाखवले जातात मात्र, पाच लाख व्यावसायिकांनी देश सोडल्याचा कोणीही शोध घेत नाहीत. त्यामुळे किती रोजगारांवर परिणाम होतो हे कुणी बघत नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं.