चिंता वाढली ; मुंबईत सात रुग्णांची भर, ओमिक्रॉन रुग्णांची संख्या २८ वर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ डिसेंबर । राज्यात ओमिक्रॉन बाधित (Omicron) रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मंगळवारी राज्यात आणखी आठ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं राज्यातील एकूण रुग्णांची संख्या २८ वर पोहोचली आहे. (Omicron in maharashtra)

राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी ८ रुग्ण सापडले आहेत. त्यातील ७ रुग्ण मुंबईतील आणि १ रुग्ण वसई- विरार येथील आहे. त्यांच्यातील ३ रुग्ण लक्षणेविरहीत असून ५ रुग्ण हे सौम्य स्वरुपाचे आहेत. या ८ रुग्णांपैकी सात रुग्णांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर, एकाने अद्याप एकही लसीचा डोस घेतलेला नाही.

ओमिक्रॉनबाधित ८ रुग्णांपैकी २ जण रुग्णालयात असून ६ जण घरी विलगीकरणात आहेत. ८ रुग्णांपैकी ३ स्त्रिया असून ५ पुरुष आहेत. प्राथमिक माहितीनुसार या पैकी कोणाचाही आंतरराष्ट्रीय प्रवाशाचा इतिहास नाही. या पैकी एकाने बंगळूर तर एकाने दिल्ली प्रवास केला आहे. तर, मुंबईतील एक व्यक्ती राजस्थानमधील आहे. या रुग्णांच्या निकटवर्तीयांचा शोध घेण्यात येत आहे.

दरम्यान, आजपर्यंत राज्यात एकूण २८ ओमिक्रॉन विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यात मुंबई – १२, पिंपरी चिंचवड -१०, पुणे मनपा -२ कल्याण डोंबिवली – १ नागपूर -१ ,लातूर -१ आणि वसई विरारच्या एका रुग्णाचा समावेश आहे. यातील ९ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

आज राज्यात ६८४ रुग्णांचे निदान झाले आहे. तर ६८६ रुग्णांना आज रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर, गेल्या २४ तासांत २४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळं राज्यातील मृत्यूदर २. १२ टक्के इतका आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.७२% एवढे झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *