एसटी संप ; हो हाच एक मुद्दा आहे, ज्यावर कुणीही बोलत नाही ; ते राज ठाकरे बोलले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१४ डिसेंबर । एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे, यात विविध मुद्दे समोर येत आहेत. पण महिन्याभरात एसटीवर जे कुणीच बोललं नाही, ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज औरंगाबादमध्ये बोलले. विशेष म्हणजे एसटीच्या विलिनिकरणाची मागणी होत असताना, ही मागणी किंवा या मुद्द्यावर कुणीच बोललेलं नाही. यात संपकरी एसटी कर्मचारी, त्यांच्या विविध संघटना याविषयावर बोलत नाहीत. यात एसटी कर्मचाऱ्यांसाठी पाठराखण करत मैदानात जे एसटी कर्मचाऱ्यांचे ‘मसिहा’ म्हणून उतरले ते देखील यावर बोलत नाहीत.

म्हणून एसटी कर्मचाऱ्यांचे जीवन नरकयातना
राज ठाकरे आज जे काही बोलले ते एसटीच्या आजारावर बोलले, एसटीच्या याच कारणामुळे एसटी कर्मचाऱ्यांना संसार चालवणे ‘ताप’ झाला आहे आणि जीवन जगणे म्हणजे नरकयातना वाटायला लागल्या आहेत.

एसटीवर सर्व मजा मारतायत – राज ठाकरे
राज ठाकरे आज म्हणाले, एसटी ही महाराष्ट्राची फार जुनी संस्था आहे, त्यांना दिवाळीतही पगार दिले जात नाहीत, हे सत्य आहे. एवढी मोठी संस्था एसटी तोट्यात जाते कशी, एसटीवर सर्व मजा मारायला पुढे आहेत, म्हणून एसटीची ही अवस्था आहे, अर्थातच याचा फटका एसटी कर्मचाऱ्यांना बसतोय.

हो हाच एक मुद्दा आहे ज्यावर कुणीही बोलत नाही, एसटीचा हा मुद्दा राज ठाकरे यांनी सांगितलाय, त्यापेक्षा प्रत्यक्षात तो आणखी भीषण आहे. एसटी भ्रष्टाचाराशिवाय तोट्यात गेलेली नाही.

खालील मुद्दे राज ठाकरे यांच्या बोलण्यात आले नाहीत, पण हे सर्वांना माहित आहेत, पण यावर कुणीही बोलायला तयार नाही. एसटीच्या कारभारात पारदर्शकता नाही. गरज नसतानाही कोट्यवधींची कंत्राटं दिली गेली हे लपलेलं नाही, हे फक्त याच सरकारच्या काळात होतंय असं नाही, एसटीचे लचके वर्षानुवर्ष, प्रत्येक सरकारच्या काळात तोडले जात आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *