महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१५ डिसेंबर । New Year Celebration Party rules : सध्या कोरोनाचा (Coronavirus) नवा व्हेरिएंट ओमायक्रोनचा (omicron) धोका वाढला आहे. त्यामुळे काही निर्बंध असताना लोक अजूनही कोविडचे नियम पाळताना दिसत नाही. आता 31 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) नवी नियमावली जारी केली आहे. उद्यापासून मुंबईत नवी नियमावली लागू होणार आहे.
मुंबईतील मॉल, हॉटेल, दुकानांमध्ये पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे. सार्वजनिक कार्यक्रमात केवळ 50 टक्के उपस्थितीची अट लागू करण्यात आली आहे. मुंबईत उद्यापासून मुंबई पोलिसांनी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. मॉल, दुकानं, सार्वजनिक वाहतूक इथे केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.
कोणत्याही सार्वजनिक ठिकाणच्या कार्यक्रमांना केवळ 50 टक्के उपस्थितीची अट ठेवण्यात आली आहे. ख्रिसमस आणि न्यू इयर पार्ट्यांसाठी हे निर्बंध आणण्यात आलेत. पार्ट्यांना केवळ 50 टक्के उपस्थिती ठेवण्यात येईल.
दरम्यान, मुंबईत 31 डिसेंबरच्या पार्ट्यांसाठी ड्रग तस्करीचे नवे फंडे दिसून येत आहेत. स्टेथोस्कोप, हेल्मेट, टायमधून तस्करी होत असल्याची बाब पुढे आली आहे. NCBच्या कारवाईत 13 कोटींचं ड्रग जप्त करण्यात आले आहे.