तब्बल दीड वर्षांनी शाळांची घंटा वाजणार ; पुण्यातील शाळा आजपासून सुरू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१६ डिसेंबर । पुणे शहरातील शाळा आजपासून (Pune Pimpri Chinchwad School Open Updates) सुरू होणार आहेत. त्यामुळे तब्बल दीड वर्षांनी पहिली ते सातवीच्या शाळांची घंटा वाजणार आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियन्टमुळं शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. आता मात्र शाळा खुल्या करण्यात येत आहेत. त्यामुळे शाळा प्रशासनाकडून यासाठी खास तयारी केली जात आहे. सोशल डिस्टन्सिंगसह सर्व प्रकारच्या खबरदाऱ्या बाळगून शाळा सुरु होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी तशी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. सगळे वर्ग स्वच्छ केले आहेत. सॅनिटायझरची फवारणी सुद्धा केली गेली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील शाळाही सुरु होणार
पिंपरी चिंचवड शहरातील शाळा आजपासून सुरू होणार. त्यामुळे तब्बल दीड वर्षांनी पहिली ते सातवीच्या शाळांची घंटा वाजणार आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी तसं परिपत्रक काढलेलं आहे. कोरोनाच्या ओमयक्रोन व्हेरियंन्टमुळं शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. आता मात्र शाळा खुल्या करण्यात येत आहेत. पण विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांचे संमतीपत्र घेण्याच्या सूचना ही शाळेला देण्यात आल्या आहेत.

काय आहेत शिक्षण विभागाच्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचना?

दोन विद्यार्थ्यांमध्ये शक्यतोवर किमान सहा फूट अंतर ठेवावे
शाळेमध्ये प्रत्येकाने मास्क घालणे बंधनकारक आहे
वारंवार हात धुवावे व शाळेत स्वच्छता ठेवावी
शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे
शाळांमध्ये बायोमेट्रिक उपस्थितिची पद्धतीचा अवलंब करू नये
शाळेत गर्दी होणार नाही असे उपक्रम , खेळ किंवा सामूहिक प्रार्थना टाळाव्यात
ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत अशाच व्यक्तींना शाळेच्या आवारात किंवा वर्गात येण्यास अनुमती नसावी
मुले किंवा शिक्षक आजारी असेल तर त्यांनी शाळेत येऊ नये ,आवश्यक नियमांचे पालन करावे
क्वारंटाईन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाची सोय उपलब्ध असावी
शाळेतील एकाच वर्गातील पाचपेक्षा अधिक मुले दोन आठवड्याच्या कालावधीत कोरोनाबाधित आढळल्यास शाळेतील कोव्हीड प्रतिबंधक कृती योजनेचा सखोल आढावा घ्यावा
शाळांची वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे
शाळेत येताना किंवा शाळा सुटल्यावर अथवा मोकळ्या वेळेत मुलांनी एकत्र येऊन नियमांचा भंग करू नये
यामध्ये ज्या शाळेत विद्यार्थी संख्या जास्त असेल त्यामुळे जास्तीत जास्त पंधरा ते वीस विद्यार्थी एका वर्गात बसतील.
एका बेंचवर एक विद्यार्थी बसेल अशाप्रकारे नियोजन करावे सोबतच विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये शाळा भरवण्यात यावी
शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलवावे
शहरी भागात महापालिका आयुक्त व इतर ठिकाणी जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद मुख्याधिकारी ,नगर परिषद यांनी शिक्षणाधिकारी ,आरोग्य अधिकारी यांच्यासमवेत सातत्याने आढावा घेऊन आवश्यक संबंधित सूचना कराव्यात
या आधीच्या टप्प्यांमध्ये ज्याप्रकारे ग्रामीण भागात शाळा सुरू करण्यासाठी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली तर महापालिका क्षेत्राकरिता आयुक्त व नगरपालिका, नगरपंचायती ,ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आले आहेत. त्या समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी चर्चा करावी
पालकांच्या संमती शाळेत येण्यासाठी आवश्यक असणार आहे, पालकांचे संमतीनेच विद्यार्थी शाळेत येऊ शकेल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *