Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; एक लिटरल पेट्रोलसाठी किती रुपये मोजावे लागतील?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१६ डिसेंबर । भारतीय तेलं कंपन्यांनी गुरुवारी सकाळी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. जवळपास दीड महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आजही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. केंद्र सरकारनं दिवाळीपूर्वी सर्वसामान्यांना दिलासा देत उत्पादन शुल्कात कपात केली होती. तेव्हापासून देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.

IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत (Petrol-Diesel Price In Mumbai) पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Petrol-Diesel Price In Pune) पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे.

देशातील प्रमुख शहरं पेट्रोलची किंमत प्रति लिटर डिझेलची किंमत प्रति लिटर
मुंबई 109.98 94.14
दिल्ली 95.41 86.67
चेन्नई 101.40 91.43
कोलकाता 104.67 89.79

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत (Petrol-Diesel Price In Delhi) पेट्रोलची किंमत (Petrol Price) 95.41 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. याशिवाय देशातील इतर महानगरांपैकी महत्त्वाचं शहर असणाऱ्या चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *