महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१६ डिसेंबर । रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे रेल्वे प्रशासन प्रवाशांसाठी अनेक सुविधा राबवत असते. पण रेल्वेच्या नियमांमध्ये वेळोवेळी बदल देखील होत असतात.
आता प्रवाशांसाठी नवीन काही नियम भारतीय रेल्वेने लागू केले आहे. दीर्घ काळापासून ज्या प्रवाशांनी ऑनलाईन तिकिट बुकिंग केलेली नाही, अशा प्रवाशांसाठी हे नियम आहेत. प्रवाशांनी हे नियम लक्षात घेण्याची गरज आहे अन्यथा त्यांना तिकिट बुकिंग करता येणार नाही. जे आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन तिकिट बुकिंग करतात त्यांना आता मोबाइल आणि ईमेल व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे तिकिट मिळू शकणार आहे.
रेल्वेने हा नवा नियम त्या प्रवाशांसाठी लागू केला आहे, ज्यांनी दीर्घकाळापासून ऑनलाईन तिकिट बुकिंग केलेली नाही. अशा लोकांना आधी त्यांचा मोबाइल नंबर आणि ईमेल व्हेरिफाय करावा लागेल, त्यानंतरच ते आयआरसीटीसीच्या वेबासाइटवरून तिकिटे विकत घेऊ शकणार आहेत. हे व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच तिकिट बुक करता येणार आहे. जे प्रवासी नियमितपणे तिकिटे बुक करत आले आहेत, त्यांना या प्रक्रियेतून जावे लागणार नाही.