महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१६ डिसेंबर । गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे सर्व IT कंपन्यांचं वर्क फ्रॉम होम सुरु होतं. त्यामुळे उमेदवारांना घरून काम करण्याची (Work From Home) संधी मिळाली होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. त्यामुळे भारतातील अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम बंद (End of WFH) करत पुन्हा ऑफिस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे IT क्षेत्रात वर्क फ्रॉम होम बंद होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. ओमायक्रॉनचा (Omicron) प्रादुर्भाव वाढला नाही आणि तिसरी लाट (Will third wave come in India?) आली नाही तर संपूर्ण ऑफिस सुरु होणार (Return to Office) यात शंका नाही. म्हणूनच आता कंपन्यांनी 45 वर्षांखालील कर्मचाऱ्यांना पुन्हा ऑफिसमध्ये बोलावण्यास (Return to Office for under 45 employees) सुरुवात केली आहे.
ओमिक्रॉन व्हेरियंटच्या प्रसारावर बारीक नजर ठेवून पुढील वर्षापासून ऑपरेशन्स वाढवण्याची योजना आखत आहेत. 45 वर्षांखालील कर्मचार्यांना हायब्रीड मॉडेल (Hybrid working model for employees) अंतर्गत कामावर परतण्यास सांगितलं जात आहे ज्यात आठवड्यातून दोन-तीन दिवस कार्यालयात हजर राहणं समाविष्ट असेल असं काही कंपन्यांचं म्हणणं आहे.
आयटी कंपन्यांच्या कामावर परत येण्याच्या योजना दुसऱ्या लाटेमुळे आणि नंतर ओमिक्रॉनच्या धोक्यामुळे पुढे ढकलल्या गेल्या, ज्यामुळे कंपन्यांना डिसेंबरपर्यंत वर्क-फ्रॉम-होम (WFH) वाढवण्यास भाग पडलं. काही आयटी कंपन्यांनी या वर्षी जून-जुलैमध्ये कार्यालयीन उपस्थिती वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं, परंतु दुसऱ्या लाटेमुळे ते होऊ शकलं नाही.
कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया लॉबी गटाने असे म्हटले आहे की ओमिक्रॉनमुळे मालमत्ता बाजारावर कोणताही विशेष परिणाम झालेला नाही आणि उत्सवानंतरच्या विक्रीतील वाढीची गती कायम राहण्याची अपेक्षा आहे. येत्या काही महिन्यांत संक्रमणामध्ये लक्षणीय वाढ झाल्याशिवाय बांधकाम आणि वितरणाच्या वेळापत्रकात कोणताही व्यत्यय दिसत नाही. त्यामुळे ऑफिस पुन्हा सुरु करण्यास काहीही हरकत नाही.
आयटी उद्योग संस्था नॅसकॉमने (NAASCOM Report about WFH) केलेल्या अभ्यासानुसार, भारतातील 50% पेक्षा जास्त तंत्रज्ञान कर्मचारी जानेवारीपासून आठवड्यातून तीन वेळा कार्यालयात परतण्याची शक्यता आहे. नॅसकॉमच्या अहवालानुसार, आठवड्यातले काही दिवस तरी कर्मचारी कार्यालयात परतण्यास उत्सुक आहेत. जवळपास 60% संस्था जानेवारीपर्यंत कार्यालयीन जागा पुन्हा उघडण्यासाठी तयार होतील अशी अपेक्षा आहे.
एकूणच काय तर हायब्रीड मॉडेलनुसार का होईना 45 वर्षांखालील कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा ऑफिस सुरु होण्याची चिन्हं आहेत. तसं फर्मानच काही इट कंपन्यांनी काढलं आहे. यासाठी काही कर्मचारी उत्सुक आहेत. मात्र जे कर्मचारी यासाठी उत्सुक नाहीत त्यांचं मात्र टेन्शन नक्कीच वाढलं आहे.