जगभरात कोरोनाचा पाच हजारांवर बळींचा आकडा पार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन : मुंबई : गुरूवारअखेरपर्यंत चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे 3189 लोकांचे बळी गेले असून, जवळपास 80 हजार 824 लोकांवर उपचार सुरू आहेत. त्याचवेळी जगभरातील सुमारे 120 देशांत पसरलेल्या कोरोना व्हायरसने आतापर्यंत 5400 लोकांचे बळी घेतले असून, 1 लाख 45 हजारपेक्षा अधिक लोक बाधित झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, 71हजार पेक्षा अधिक लोक संसर्गातून बरे झाले आहेत. इटलीत कोरोनामुळे 1266 लोक दगावले आहेत. गेल्या 36 तासांत 7 नव्या देशांमध्ये कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आले आहे. समाधानाची बाब म्हणजे 51.2 टक्के लोक कोरोनाच्या आजारातून बरे झाले आहेत. ईरानमध्ये कोरोनाने आज 97 बळी घेतले असून, मृतांची संख्या 611वर पोहोचली आहे. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून फ्रान्स, पोर्तुगाल, बेल्जियम, आयर्लंड, पाकिस्तान, माल्टा आणि लक्झमबर्ग या देशांत शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर केली असून, मोठ्या कार्यक्रमांच्या आयोजनावरही बंदी घातली आहे.

इटलीत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावत आहे. इटलीत काही भारतीय नागरिकही अडकले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी एक वैद्यकीय पथक भारतातून इटलीत दाखल झाले आहे. भारतीय नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. या भारतीयांना मायदेशी लवकरात लवकर पाठवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती भारतीय दूतावासाने दिली. दूतावासाच्या संपर्कात असलेल्या विद्यार्थ्यांना, नागरिकांना आवश्यक मदत पुरवण्यात येत असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *