महाराष्ट्र २४ ऑनलाईन : मुंबई : कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे देशातील आणि राज्यातील पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. राज्यात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात येणारे पर्यटक त्यांचं बुकिंग रद्द करत आहेत.जवळपास 75 टक्के परदेशी पर्यटकांनी विदर्भातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचं त्यांचं बुकिंग रद्द केल्यामुळे मोठा फटका बसला आहे. तर औरंगाबादची अजिंठा लेणी ओस पडलेली दिसून येत आहे.
कोरोना व्हायरसच्या भीतीने पर्यटकांनी औरंगाबादला पाठ दाखवली.”
कोकणातही अशीच परिस्थिती आहे. कोकण पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनीही त्यांचं बुकिंग रद्द केलं आहे. याशिवाय कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील भाविकांची संख्या कमी झाली आहे. तसंच पन्हाळा गड, ज्योतिबा मंदिर याठिकाणी थोडा फार परिणाम झाला आहे. तर नाशिकमधल्या तीर्थक्षेत्रांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली आहे. कोरोनामुळे पर्यटक व्यवसायावर परिणाम होत आहे, पण, सध्या सरकारची प्राथमिकता ही अधिकाधिक लोकांना कोरोनाची लागण होण्यापासून वाचवणं ही आहे,
“सरकारनं सध्या तरी व्हिसा स्थगित करण्याचा निर्णय दिला आहे, पण देशांतर्गत वाहतूक करणारे प्रवासीही कोरोना व्हायरसमुळे चिंतेत आहेत. अनेकांनी लग्नाच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत, मीटिंग रद्द केल्या आहेत,”
हॉटेल व्यवसायावर परिणाम
हॉटेल व्यवसायावर कोरोनाचा सर्वाधिक परिणाम झाल्याचं ‘फेडरेशन ऑफ होटल अँड रेस्टॉरंट इंडस्ट्री’चे निर्देशक राजेंद्र कुमार सांगतात.
हॉटेलमध्ये लोक जेवणासाठी येत नसल्यामुळे त्यांनी कर्मचाऱ्यांची एकच शिफ्ट लावली आहे.
ते सांगतात, “सरकारनं शाळा-कॉलेज, चित्रपटगृह, विदेश यात्रा बंद केल्यामुळे लोकांमधील चिंता वाढली आहे. यामुळेच मार्च आणि एप्रिलमधील 80 टक्के बुकिंग रद्द झाली आहे. कदाचित उन्हाळ्यात या परिस्थितीत थोडा फरक पडेल.”