महाराष्ट्र २४ ऑनलाईन : मुंबई : कोरोना विषाणूमूळे राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतं आहे. यामुळे जनतेने गर्दीची ठिकाण टाळा असे आवाहन सरकारकडून केलं आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा यंदाचा गुढीपाडवा मेळावा रद्द करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अधिकृत पत्राद्वारे सर्व मनसैनिकांना याबाबतची माहिती दिली.
‘कोरोना’चं सावट गडद आहे त्यामुळे ह्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘गुढीपाडवा मेळावा’ रद्द करत आहोत.
तसंच येत्या काही आठवड्यात महापालिकांच्या निवडणूका होणार आहेत पण एकूण परिस्थिती पाहता सरकारने ह्या निवडणुका किमान सहा महिन्यांसाठी पुढे ढकलाव्यात.
दरवर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबईत शिवाजी पार्कवर मनसेचा मेळावा आयोजित केला जातो. या मेळाव्यासाठी मुंबईसह राज्यातून मोठ्या संख्येने मनसैनिक शिवतीर्थावर येतात. मात्र कोरोनाची साथ जास्त पसरु नये, तसेच कोरोना आटोक्यात येण्यासाठी अडचण निर्माण होऊ नये यासाठी गुढीपाडव्याचा मेळावा रद्द केला आहे. राज्यातील नागरिकांचं आरोग्य आणि सुरक्षितता या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत.