किम जोंगचा नवा फतवा ; 11 दिवस हसण्यावर बंदी, तर दारुही मिळणार नाही

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१७ डिसेंबर । आपल्या अनेक विक्षिप्त निर्णयामुळे उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन कायम चर्चेत असतो. आता देखील तो एका निर्णयामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. उत्तर कोरियात आता 11 दिवस हसण्यावर बंदी असणार आहे. लोकांनी जर सेलिब्रेशन केले किंवा हसताना दिसले, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. देशाचे माजी नेते आणि सध्याचा हुकुमशहा किम जोंग उनचे वडील किम जोंग-इल यांच्या 10 व्या पुण्यतिथिच्या निमित्ताने सरकारने लोकांच्या हसण्यावर बंदी घातली आहे.

11 दिवसांपर्यंत देशात किम जोंग-इल (Kim Jong-il) च्या पुण्यतिथी निमित्त कुणीही आनंद साजरा करु शकणार नाही. राष्ट्रीय शोक असल्यामुळे लोकांच्या हसण्यावर आणि दारु पिण्यावर बंदी असणार आहे.

एका रिपोर्टनुसार हुकुमशहा किम जोंग उनच्या आदेशानुसार 17 डिसेंबर म्हणजे आज लोकांना किराणा सामान खरेदी करण्याची देखील परवानगी नाही. आदेश न मानणाऱ्या लोकांविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय शोक असलेल्या काळात जर कुणी दारु प्यायलेले किंवा नशा करताना आढळले, तर तो व्यक्ति आजवर परत आलेला नाही. सोबतच राष्ट्रीय शोक असताना जर कुणाच्या घरी मृत्यू झाला, तर तो परिवार जोरात रडू शकणार नाही.

त्याचबरोबर या काळात वाढदिवस आणि अन्य सोहळे सेलिब्रेट करण्याची देखील परवानगी नाही. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांना अटक केले जाते. त्यानंतर अटक केलेले नागरिक परत कधीच दिसून येत नसल्याचे सांगितले जाते. पोलिसांची या काळात लोकांवर करडी नजर असते. या दरम्यान, जो व्यक्ति उदास दिसत नाही, त्याला पोलिस अटक करतात. पोलिसांसाठी देखील हे 11 दिवस जिकरीचेच असतात.

आपल्या विचित्र निर्णयांमुळे उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन कायमच चर्चेत असतो. किम जोंग उन याने काही दिवसांपूर्वी आपल्या देशातील लोकांसाठी एक नवा विचित्र नियम लागू केला आहे. हुकूमशहा किम जोंग उन त्याच्या आवडत्या लेदर कोटची कॉपी केल्यामुळे चांगलाच संतापला होता. त्याने आता देशात लेदर कोटच्या विक्रीवर आणि परिधान करण्यावरच बंदी घातली आहे. या नियमानंतर उत्तर कोरियामध्ये कोणालाही लेदर कोट विकता किंवा घालता येणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *