पुण्यात धोका वाढला, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 15 वर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ; पुणे -‘पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 15 वर पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासात पाच नवीन रुग्ण ऍडमिट करण्यात आले आहेत. काल पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले, त्याबद्दल आम्हाला चिंता आहे. कारण ते कुठेही परदेशात गेले नव्हते. पण त्यांचा एक नातेवाईक कोरोना पॉझिटिव्ह होता. त्याच्या संपर्कात आल्यामुळे हे पाच जणही कोरोना बाधित झाले,’ अशी माहिती पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

‘पुण्यात 57 जण ऍडमिट आहेत. NiV 315 सॅम्पल पाठवले होते. त्यातील 294 रिपोर्ट प्राप्त झाले. यातील 15 जण वगळता बाकी निगेटिव्ह आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत पुण्यात 15 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काल आम्ही मॉलही बंद केले आहेत. फक्त त्यातील मेडिकल्स जीवनावश्यक वस्तूंचे स्टोअर्स सुरू राहतील. त्यामुळे लोकांनी घरं सोडू नयेत, ही कळकळीची विनंती, शासन आदेशाचं पालन करावं,’असं आवाहन दीपक म्हैसेकर यांनी केलं आहे.

कोरोना संदर्भात खबरदारीचा पर्याय म्हणून सगळ्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यात राज्यातल्या सरकारी आणि खासगी सर्व शाळांचा समावेश आहे. येत्या 31 मार्चपर्यंत राज्यातील सर्व शाळा बंद राहतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत सांगितलं.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *