महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१७ डिसेंबर । कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron Variant) धोका दिवसेंदिवस वाढत आहे. देशाच ओमायक्रॉनचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. हिंदुस्थानमधील 11 राज्यांमध्ये हा नवा व्हेरिएंट पसरला असून रुग्ण संख्या शंभरी पार गेली आहे. देशात ओमायक्रॉन बाधितांची संख्या 101 झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली.
https://twitter.com/ANI/status/1471794830875316224?s=20
ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि दिल्लीत आहेत. महाराष्ट्रात नव्या व्हेरिएंटचे 32 रुग्ण आढळले, परंतु दिलासादायक म्हणजे यातील बहुतांश रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर दुसरीकडे दिल्लीत ओमायक्रॉन बाधिक रुग्णांचा आकडा 22 झाला आहे. येणाऱ्या काळामध्ये कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट डेल्टाची जागा घेईल, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले. या व्हेरिएंटची उपचारपद्धती जागतिक आरोग्य संघटनेने ठरवून दिलेल्या मानकांप्रमाणेच राहील असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले.
देशात गेल्या 20 दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा 10 हजारांच्या आहेत आहे. पॉझिटिव्हीटी रेट सध्या 0.65 आहे. परंतु यातील जवळपास 40.31 टक्के रुग्ण एकट्या केरळमधील आहेत, अशी माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली.