CNG, PNG Price Hike: सीएनजी, घरगुती पाईपलाईन गॅस ग्राहकांना जोराचा झटका; आज मध्यरात्रीपासून दरवाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१७ डिसेंबर । एकीकडे पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरचे दर गगनाला भिडलेले असताना आता परवडणाऱ्या सीएनजी आणि घरगुती गॅस पाईपलाईनचे दरही वाढणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे.

एमजीएलने 17 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ही दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार सीएनजीचा दर दोन रुपये प्रति किलोला वाढविण्यात येणार आहे. तर डोमेस्टिक पीएनजीचा दर 1.50/SCM रुपयांनी वाढविण्यात येणार आहे. ही दरवाढ 17 आणि 18 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून केला जाणार आहे.

ही दरवाढ मुंबईत केली जाणार असल्याचे एमजीएलने सांगितले आहे. यामुळे दर वाढविल्यानंतर सीएनजीचे नवे दर ₹63.50/Kg आणि पीएनजीचे नवे दर ₹ 38.00/SCM होणार आहेत. ही दरवाढ झाली तरी देखील पेट्रोलशी तुलना केल्यास सीएनजी ग्राहकांचे 60 टक्के आणि डिझेलशी तुलना केल्यास 33 टक्के पैसे वाचणार असल्याचा दावा महानगर गॅसने केला आहे. तसेच एलपीजी ग्राहकांपेक्षा पीएनजी ग्राहकांची 24 टक्के पैशांची बचत होणार असल्याचे एमजीएलने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *