देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर्स; जाणून घ्या किंमत-फीचर्स

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ डिसेंबर । Cheapest e-Scooters in india : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सतत होणारी वाढ यामुळे भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicle) मागणी वाढत आहे. कार असो की बाईक, लोकांचा कल इलेक्ट्रिक वाहने (EV) खरेदी करण्याकडे अधिक असतो. अनेक वाहन कंपन्यांनी आता डिझेल-पेट्रोल आणि सीएनजी इंजिनसह इलेक्ट्रिक वाहने बनवण्यास सुरुवात केली आहे.

आता पेट्रोलवर चालणाऱ्या स्पोर्ट बाइक्सप्रमाणेच इलेक्ट्रिक स्कूटर्स (Electric Scooters) ची मागणीही भारतीय बाजारपेठेत वाढल्याचे दिसून येत आहे. जर तुम्ही ई-स्कूटर (E-Scooter) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कमी किमतीत सर्वोत्तम रेंज देणाऱ्या देशातील 3 सर्वात स्वस्त EV स्कूटर्सबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत..

हिरो इलेक्ट्रिक फोटॉन (Hero Electric photon)

किंमत – फोटॉन LI – 61,866 रुपये, फोटॉन LP – 72,990 रुपये

चार्जिंग वेळ – 5 तास

हिरो ही खूप जुनी आणि विश्वासार्ह कंपनी असून हिरोची इलेक्ट्रिक फोटॉन स्कूटर भारतीय बाजारपेठेत दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये 72 LI आणि LP यांचा समावेश आहे . या स्कूटरच्या 72 LI व्हेरिएंटची किंमत 61,866 रुपये आणि LP व्हेरिएंटची किंमत 72,990 रुपये आहे. हीरोची ही स्कूटर एकदा चार्ज केल्यास 108 प्रति किलोमीटरची चालते.

यात 76 V, 26 Ah ची बॅटरी दिली आहे, जी 1200 W मोटर पॉवर जनरेट करते, त्याच वेळी, त्याचा टॉप स्पीड 42 किलोमीटर प्रति तास आहे. त्याची बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 5 तास लागतात. यात कंबाइन्ड ब्रेकिंग सिस्टम, चार्जिंग पॉइंट, स्पीडोमीटर आणि घड्याळ हे फीचर्स देण्यात आले आहेत.

Pure EV Epluto

किंमत- 71,999 रुपये

चार्जिंग टाइम- 4 तास

Pure EV Epluto मध्ये एअर कूल्ड इंजिन देण्यात आले असून यात 1800w मोटर सपोर्ट मिळतो. Pure EV पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 4 तास लागतात. यात फ्रंट डिस्क आणि रियर ड्रम ब्रेक आहे. तसेच ABS, स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिपमीटर देण्यात आले आहेत. एकदा चार्ज केल्यास ही स्कूटर तब्बल 80 किलो मीटर चालते.

किंमत 76,848 रुपये

चार्जिंग वेळ – 3-4 तास

Okinawa PraisePro ही देशातील सर्वात स्वस्त EV स्कूटरपैकी एक आहे ज्याची किंमत 76,848 रुपयांपासून सुरु होते. यामध्ये 2.0 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, ज्याला चार्ज करण्यासाठी तीन ते चार तास लागतात. या स्कूटरचा टॉप स्पीड 58 किमी प्रतितास आहे. या स्कूटरच्या बॅटरीसाठी तुम्हाला 3 वर्षांची वॉरंटी दिली जात असून, त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर कोणताही परिणाम होणार नाही. फीचर्सच्या बाबतीत, यात चार्जिंग पॉइंट, डीआरएल, एलईडी टेल लाईट, डिजिटल स्पीडोमीटर आणि ट्रिपमीटर आहे.

टिप. वर देण्यात आलेल्या या किंमती दिल्लीच्या एक्स-शोरूमच्या आहेत. त्याच्या किंमतीतील वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदल असू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *