पुणे : सहा महिने आधीच शहांनी महानगरपालिकेच्या प्रचाराचा नारळ फोडला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ डिसेंबर । केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे सध्या महाराष्ट्र (Maharashtra) दौऱ्यावर आहेत. आगामी काळातील पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या (Pune Municipal Corporation Elections) पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी अमित शहा यांनी थेट पुणे महानगरपालिकेच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी अमित शहांनी थेट महाविकास आघाडी सरकारवर (MVA Government) निशाणा साधला.

आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उडी घेत अमित शहा यांनी महाविकास आघाडी सरकारला खुलं आवाहन दिलं आहे. महाविकास आघाडी सरकारने डीबीटीची एक वेगळी व्याख्या बनवली असून, काँग्रेसने डीलर, शिवसेनेने ब्रोकर आणि राष्ट्रवादीने ट्रान्सफर करत भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला. यातूनच अनेकजण जेलमध्ये गेले असंही ते म्हणाले. ‘आगामी काळात तिन्ही पक्षांशी आम्ही एकत्र लढू, महाराष्ट्राची जनता देखील तयार आहे असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीला थेट आव्हान दिलं आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या पतनाची सुरुवात पुणे महापालिकेच्या निकालानं व्हायला हवी. लक्ष्य कधी कमी ठेऊ नका मित्रांनो. मी ऐकत होतो कोणी १०० तर कोणी १२० नगरसेवक असं म्हणतं होतं. पण जनता तुम्हाला जास्त नगरसेवक द्यायला बसली आहे, त्यामुळं मागण्यात कंजुषी करु नका. पुण्याची जनता फुलानं तुमचं स्वागत करायला तयार आहे. परिश्रम करा हे आपोआप होईल, अशा शब्दांत त्यांनी पुण्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि नगरसेवकांना प्रोत्साहित करत थेट पुण्याच्या राजकारणात उडी घेतली.

दरम्यान, भारतीय जनता पक्ष हा सर्व सामान्य कार्यकर्त्यांना संधी देणारी संधी आहे, मी सुद्धा एक बुथ प्रमुख म्हणून काम केलं होतं, त्यानंतर पक्षाने मला थेट अध्यक्ष होण्याची संधी दिली असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *