महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२१ डिसेंबर । दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक बोर्डाने आज जाहीर केलं आहे. उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र आणि माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या होत्या. त्यानंतर आता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. चार मार्च ते सात एप्रिल २०२२ या कालावधीत बारावीची तर १५ मार्च ते १८ एप्रिल २०२२ या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा होणार असल्याचं त्यांनी याआधी सांगितलं होतं. दोन्ही परीक्षा प्रत्यक्ष केंद्रावर होणार आहेत. कोरोनामुळे अभ्यासक्रमात कपात करण्यात आली आहे.
दहावीच्या परीक्षेचं वेळापत्रक
15 मार्च : प्रथम भाषा (मराठी, हिंदी उर्दू, गुजराती आणि इतर प्रथम भाषा)
16 मार्च : द्वितीय वा तृतीय भाषा
19 मार्च : इंग्रजी
21 मार्च : हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)
22 मार्च : संस्कृत, उर्दू ,गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय (द्वितीय किंवा तृतीय भाषा)
24 मार्च : गणित भाग – 1
26 मार्च : गणित भाग 2
28 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1
30 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2
1 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 1
4 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 2