Herbs : व्हायरल इन्फेक्शन दूर ठेवतात आणि प्रतिकारशक्ती वाढवतात या आयुर्वेदिक औषधी वनस्पती, जाणून घ्या याबद्दल !

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ डिसेंबर ।

गिलोय ही एक खास आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ही वनस्पती रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास, संसर्गाशी दूर ठेवण्यास मदत करते. गिलोय खोकला दूर करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे.

हजारो वर्षांपासून अश्वगंधा औषधी वनस्पती म्हणून वापरली जात आहे. ही वेदना आणि सूज कमी करण्यास मदत करते. झोपेची समस्या दूर करण्यासाठी देखील ही वनस्पती फायदेशीर आहे.

तुळशीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे श्वसनाचे आजार बरे होण्यास मदत होते. ही औषधी वनस्पती संसर्ग टाळण्यासाठी मदत करते.

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, एमिनो अॅसिड, पेक्टिन यांसारखे पोषक घटक असतात आणि त्यात भरपूर अँटीऑक्सिडंट असतात. या औषधी वनस्पतीमध्ये दाहक-विरोधी, अँटी-मायक्रोबियल, हेपॅटोप्रोटेक्टिव्ह आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म सारखे उपचार गुणधर्म आहेत. तसेच आवळा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासही मदत करतो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *