या 2 राज्य सरकारांनी जारी केले आदेश ; वॅक्सीन नाही तर पगार नाही

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२२ डिसेंबर । कोरोनाचा उद्रेक कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. कोरोनाचा नवा प्रकार ओमायक्रॉन (Omicron) अनेक देशांमध्ये धुमाकूळ घालत आहे. त्यातच आता सगळेच सरकार लसीकरणावर मोठा भर देत आहे. कोरोनावर सध्या वॅक्सीन हाच एक उपाय आहे. (No vaccine no salary policy)

पंजाब सरकारने (Punjab Government) सरकारी कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पंजाब सरकारने आज कोरोना लसीकरण न घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार रोखण्याबाबत अधिसूचना जारी केली आहे. काही दिवसांपूर्वी पंजाब सरकारच्या वतीने लसीकरण न झालेल्या कर्मचाऱ्यांचे पगार बंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यासंदर्भात आज अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

पंजाब सरकारच्या या निर्णयानंतर हरियाणा सरकारने (Hariyana government) ही हा आदेश जारी केला आहे. या शिवाय ज्या लोकांना अजूनही वॅक्सीन घेतली नाही अशा व्यक्तींना 1 जानेवारीपासून बस, बँका, मॉल तसेच सार्वजनिक ठिकाणी प्रवेश देणार असल्याचं देखील राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी म्हटलं आहे. (No entry in bus, mall and bank without vaccination certificate)

लोकांना स्वतःला लस देण्यास भाग पाडण्याचे पंजाबचे कठोर धोरण अशा वेळी आले आहे जेव्हा कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन स्ट्रेनबद्दल मोठी चिंता आहे, जो लोकांना मोठ्या प्रमाणात संक्रमित करतो.लसीकरण प्रमाणपत्र घेऊनच आता बाहेर पडावे लागणार आहे. हळूहळू देशभराय याची अमंलबजावणी होण्याची शक्यता आहे.

देशात आतापर्यंत ओमिक्रॉन प्रकाराच्या संसर्गाची 210 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ज्यात 99 जण बरे झाले आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने आज सांगितले.मंत्रालयाने सकाळी 8 वाजता अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार भारतात 6,317 नवीन कोरोना व्हायरस संसर्गाची नोंद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *