महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२३ डिसेंबर । पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 10 वा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला जाणार आहे. देशभरातील सुमारे 12 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सन्मान निधीचे पैसे वर्ग केले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2022 ला दुपारी 12 वाजता देशातील 12 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सम्मान निधी योजनेचा 10 वा हप्ता वर्ग केला जाणार आहे.
केंद्र सरकारच्यावतीने आतापर्यंत 10 व्या हफ्ताबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. मात्र आता शेतकऱ्यांच्या त्यांच्या मोबाइलवर एसएमएसकरुन 10 व्या हफ्ताविषयी माहिती दिली जात आहे. त्यानुसार आता नववर्षाच्या पहिल्या दिवशी 12 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये येणार आहेत. पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी वर्षभरात 12 हजारांची मदत करण्यात येते. 1 जानेवारीला येणारा हफ्ता हा 2021 च्या शेवटचा हफ्ता असणार आहे.