महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२३ डिसेंबर । देशभरात कोरोनाचे नवे रुप असलेल्या ओमायक्रॉनने बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाचे हे नवे रूप शोधून काढणाऱ्या डॉ.अँजेलिक कोएत्जी यांनी ओमायक्रॉन हा किती भयानक आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. इंडिया टुडे या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ओमायक्रॉनला हलक्यात घेऊ नये असे आवाहन केले आहे. कोरोनाचे विषाणू सगळीकडे असून नुसते बाजार बंद करून काहीही उपयोग होणार नाही असं अँजेलिक यांनी सांगितले आहे. ओमायक्रॉनची किरकोळ लक्षणे असणाऱ्यांना भले रुग्णालयात दाखल करावे लागत नसेल, मात्र त्यांनाही उपचाराची गरज असल्याचं अँजेलिक यांनी सांगितले आहे.
1) घरातील एक व्यक्ती बाधित असेल तर त्याच्या घरातील इतर सुरक्षित असतात का ?
ओमायक्रॉनचा संसर्गवेग अधिक आहे, सात लोकांच्या घरातील एका व्यक्तीला याची बाधा झाली तर इतर लोकांनाही तो बाधित करेल हे मानूनच चाला.
2) किरकोळ लक्षणे असणाऱ्यांनी रुग्णालयात दाखल होण्याची गरज आहे का ?
किरकोळ लक्षणे असणाऱ्यांनाही उपचाराची गरज आहे. त्यांना भले रुग्णालयात दाखल करण्याची गरज नसेल मात्र त्यांना उपचार गरजेचे आहेत. हा व्हायरस वेगाने पसरत असून या व्हायरसमुळे आयसीयुमध्ये पोहोचलेल्यांपैकी बहुतांश लोकांनी लस घेतलीच नसल्याचं उघड झालं आहे. ज्यांनी लस घेतली आहे, त्यांच्यात किरकोळ लक्षणे दिसत आहेत.
3) ओमायक्रॉ़नमुळे काही ठराविक लोकांना अधिक धोका आहे ?
जर तुमचं वजन जास्त असेल आणि तुम्ही लस घेतली नसेल तर तुम्हाला हा व्हायरस अधिक त्रास देणारा ठरेल
4) ओमायक्रॉनची लक्षणे काय ?
ओमायक्रॉनची लागण झाल्यानंतर सुरुवातीला स्नायू दुखायला लागतात. सर्दी-खोकला ही या विषाणूने बाधित लोकांची लक्षणे नाहीयेत. पाठीचा खालचा भाग दुखणे हे या व्हायरसने बाधित रुग्णांमधील नवं लक्षण आहे. खोकल्याच्या तुलनेत स्नायू दुखणे हे मुख्य लक्षण आहे. अंगदुखी, थकवा डोकेदुखी ही या विषाणूने बाधित लोकांमध्ये दिसून येणारी प्रमुख लक्षणे आहेत.
5) बाहेर जाणं कितपत सुरक्षित आहे ?
बाजार बंद करून भागणार नाहीये, लस आपले संरक्षण करत असून आपण या व्हायरसपासून आपला बचाव करणं गरजेचं आहे. जर रुग्णालयातील रुग्णांची संख्या वाढली तर तातडीने कठोर पावलं उचलायला लागतील.
6) कोविड आणि न्यूमोनियात काही संबंध आहे का ?
ओमायक्रॉन श्वसन यंत्रणेवर मुख्यत्वे हल्ला करतो, ज्यामुळे तुम्हाला न्यूमोनियादेखील होऊ शकतो. मात्र त्याची तीव्रता ही जास्त नसते.
8) बूस्टर डोस द्यावा का ?
बूस्टर डोस द्यायला हवा, हिंदुस्थानातही बूस्टर डोस देणं गरजेचं आहे.
8) लॉकडाऊनचा फायदा होईल का ?
सण उत्सवांनंतर कोरोनाचे रुग्ण वाढण्याची भीती आहे. हा व्हायरस सगळीकडे असल्याने लॉकडाऊनने भागणार नाही. लोकांनी आपल्या सामान्य ज्ञानाचा वापर करावा आणि बाजारात जाणे बंद करावे. व्हायरसपासून आपण आपला बचाव करावा.
9) निर्बंध कडक केव्हा करावेत ?
रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढताच आपल्याला कडक पावलं उचलण्याची गरज आहे हे समजून जावे.
10 ) न्यू ईयर सेलिब्रेशन पार्टी करावी का ?
दक्षिणा आफअरिकेत सिरो पॉझिटीव्हीटी दर अधिक आहे. हिंदुस्थानातही असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही.