महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ डिसेंबर । झी एंटरटेनमेंट व सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाच्या विलीनीकरणामुळे २६.७% व्ह्यूअरशिप वाट्यासह हे देशातील सर्वात मोठे मनोरंजन नेटवर्क झाले आहे. सध्या स्टार-डिस्नी १८.६% सह नंबर-१ होते. संयुक्त कंपनीकडे सर्वाधिक ६३% हिंदी चित्रपटांचे हक्क असतील.
हे झाले… झी-सोनीकडे २७% प्रेक्षक, देशाचे सर्वात मोठे मनोरंजन नेटवर्क
१६ हजार कोटी रु. पर्यंत पोहोचेल महसूल
– नव्या कंपनीत सोनीचा ५०.८६%, झीच्या प्रमोटर्सचा ३.९९%, इतर शेअरधारकांचा ४५.१५% वाटा.
– दोन्ही कंपन्यांचे संयुक्त मूल्य १० अब्ज डॉलर म्हणजे ७५ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल.
कमाईत हॉटस्टारनंतर दुसऱ्या स्थानी जाईल
– 400 कोटी रु. आहे झी-सोनीचा महसूल, देशात डिस्नी स्टारनंतर दुसऱ्या स्थानावर जाईल.
– 500 रु. प्रति युजर सरासरी कमावते झी, ८०० रु. सोनीची कमाई, डिस्नीची १५०० रु. आहे.
हे मिळाले… जगातील १८४ कोटी टीव्ही-ओटीटी प्रेक्षक क्रिकेट, मूव्ही व ओरिजनल कंटेंटचा डबल डोस घेतील
या संयुक्त कंपनीकडे ७५ चॅनल, दोन ओटीटी प्लॅटफॉर्म (झी5-सोनी लिव्ह), दोन चित्रपट स्टुडिओ व एक डिजिटल कंटेंट स्टुडिओ असेल. या दोघांच्या देश-जगातील एकूण १८४ कोटी प्रेक्षकांना फायदा.सोनीच्या प्रेक्षकांना झीच्या ४८०० चित्रपटांच्या लायब्ररीपर्यंत पोहोच मिळेल, तर झीच्या प्रेक्षकांना सोनीच्या १० स्पोर्ट्स चॅनलचा आनंद मिळेल.
ओटीटी कंटेंटवर ३ हजार कोटींची रक्कम
– सोनी १.६ अब्ज डॉलर रोख देणार. त्याद्वारे डिजिटल प्लॅटफॉर्म व स्पोर्ट्ससह अनेक प्रीमियम कंटेंट आणणार.
– सोनीकडे क्रिकेटसोबतच डब्ल्यूडब्ल्यूई, फिफा व युरो कप यांसारख्या स्पोर्ट्स इव्हेंटची रेंज आहे.
मनोरंजन विश्वाचा नकाशा बदलणार हा करार
– 20% व्ह्यूअरशिप वाटा आहे झीचा दक्षिण भारतात, टीव्हीवर चित्रपटांतही २५% भागीदारी आहे.
– 85 शेअर दिले जातील नव्या कंपनीत शेअरधारकांना झी कंपनीतील प्रत्येक १०० शेअरच्या बदल्यात.
हे होणार… आयपीएल राइट्समध्ये प्राइस वॉर, ५० हजार कोटींपर्यंत बोली शक्य
या डीलचा आणखी एक मोठा परिणाम आयपीएल राइट्सच्या डीलमध्येही दिसेल. स्टार इंडियाने २०१७ मध्ये ५ वर्षांसाठी २.६ अब्ज डॉलरमध्ये (१९५०० कोटी रु.) आयपीएलचे राइट्स घेतले होतेे. २०२३-२७ साठी झी-सोनीचीही बोली लावण्याची तयारी.
कारण हे आहे…स्पर्धा दिग्गजांत होणार
– बीसीसीआयचा यंदा आयपीएल ब्रॉडकास्टिंग राइट्स ४० हजार कोटी रुपयांत विकण्याचा अंदाज आहे. पण रक्कम ५० हजार कोटी रुपयांपर्यंतही जाऊ शकते.
– फेसबुक, अॅमेझॉन, रिलायन्स, झी-सोनीत स्पर्धा आहे.
…यामुळे येथे होतो ‘पैशांचा पाऊस’
40% चा वाटा आयपीएलचा आहे जगभरात क्रिकेटमुळे होणाऱ्या एकूण वार्षिक महसुलात.
25 लाख रु. प्रति १० सेकंदांच्या दराने विकल्या होत्या जाहिराती आयपीएलच्या मागील हंगामात.