Corona Vaccination : बूस्टर डोसबाबत नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी, जाणून घ्या सविस्तर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२८ डिसेंबर । केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीच्या बूस्टर डोसबाबत (booster dose in india) मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने बूस्टर डोसबाबत मार्गदर्शक तत्त्वांमध्ये (guidlines) जारी केली आहेत. यानुसार कोणत्याही प्रमाणपत्राशिवाय, 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना बूस्टर डोस देण्यात येईल. याशिवाय ज्यांना गंभीर आजार आहे ते देखील बूस्टर डोससाठी पात्र असतील. या लोकांना बूस्टर डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर कोणतंही प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही.

पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांबाबतही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. निवडणूक कर्तव्यासाठी तैनात करण्यात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोस दिला जाईल, असं सांगण्यात आलं आहे. निवडणूक असलेल्या राज्यांमध्ये कर्तव्यावर तैनात कर्मचार्‍यांची गणना फ्रंटलाइन वर्कर म्हणून केली जाईल आणि त्यांना बूस्टर डोस देखील मिळेल.

10 जानेवारीपासून वृद्ध आणि फ्रंटलाईन वर्कर्सना बूस्टर डोस देण्याची प्रक्रिया सुरु होईल. बूस्टर डोससाठी सुरुवातीला 60 वर्षांवरील लोक आणि गंभीर आरोग्य समस्या असलेल्या लोकांना प्राधान्य दिलं जाईल. यासाठी त्याना कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवण्याची आवश्यकता नाही. अशा लोकांनी बूस्टर डोस घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं आरोग्य मंत्रालयाने आपल्या मार्गदर्शक तत्त्वात म्हटलं आहे.

आरोग्य मंत्रालयाने 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठीही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन लस घेता येणार आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. पण जर लसीचे स्लॉट उपलब्ध असतील तर ऑनलाईन अपॉईंटमेंटचीही गरज नाही.

खबरदारीचा उपाय म्हणून बूस्टर डोस दिला जाणार आहे. ज्यांचं वय 60 वर्षाहून अधिक आहे आणि ते गंभीर आजाराने ग्रस्त आहे अशाच लोकांना बूस्टर मिळू शकतो. तुमच्या घरातही वृद्ध व्यक्ती आहे, आणि त्यांना कोणताही गंभार आजार नाही तर त्यांना Precautionary Dose देण्याची गरज नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *